पुणे- औरंगजेबाप्रमाणे भाजपचीही कबर इथेच खोदणार असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. पुण्यात आज ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी राऊतांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजप आता हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी राणीनीती आखणार असल्याचे बोलले जात होते. याचाच उल्लेख करत राऊतांनी भाजपचा समाचार घेतला आहे.
यावेळी बोलतांना संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लफंग्यांना शिवसेना चोरता येणार नाही. पुण्याच्या पवित्र भूमीतून शिवसंकल्प मेळाव्याची सुरुवात होत आहे. छत्रपती शिवराय इथे जन्माला आले. औरंजेब गुजरातमध्ये जन्माला आला होता. आम्ही मोदी- शहांना औरंगजेबाची औलाद का म्हणतो? कारण औरंगजेब आला राज्य काबीज करून गेला. त्याला मोकळ्या वेळेत टोप्या विणण्याचा छंद आहे. तसेच काहीसे मोदींचे छंद आहेत”, असा टोला राऊतांनी लगावला आहे.पुढे संजय राऊत म्हणाले, औरंगजेबाच्या बेगमने त्याला विचारले होते जहाँपना तुम्हाला काय मिळवायचे आहे? तेव्हा औरंगजेबाद त्याच्या बेगमला महाराष्ट्र काबीज करणार असे म्हंटलं होता. संपूर्ण देश काबीज करून मी शांतपणे जगायला सुरुवात करेल असे तो म्हणाला होता. तेव्हा त्याची बेगम त्याला म्हणाली, आत्ताच तुम्ही शांतपणे का जगत नाहीत? त्याच्या आयुष्यात तो निवांतपणा आला नाही शेवटी त्याची कंबर इथेच आहे. अशाच प्रकारे भाजपची कबर इथेच खोदली जाणार आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांना जागे करावे लागेल”, असे राऊत म्हणाले.पुढे ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वीची बातमी आहे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजप रणनीती आखणार आहे. हिंदूंच्या मतांसाठी त्यांना रणनीती आखावी लागते म्हणजे लोकसभेत त्यांना हिंदूंची मते मिळाली नाहीत. आम्हाला मुस्लिमांची मते मिळाली असा आरोप त्यांच्याकडून होतो. मात्र आम्हाला देशातील सर्व नागरिकांनी मते दिली. सर्व जाती- धर्माच्या लोकांनी उद्धव ठाकरेंना मतदान केले आहे. कारण या राज्यात उद्धव ठाकरेंचाच चेहरा आश्वासक आहे”, असे राऊत म्हणाले.तसेच यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. हिंदूंच्या मतांसाठी ते आता कामाला लागले. याचा अर्थ 30-35 वर्षे ते काय होते? त्यांच्यासोबत आमची शिवसेना होती म्हणून हिंदूंची मते त्यांना मिळत होती. मात्र आता हिंदूंच्या मतांसाठी त्यांना धडपड करावी लागत आहे. 5 ऑगस्टला काश्मीरमधून 370 हटवून पाच वर्षी पूर्ण होत आहेत. मात्र पाच वर्षांत काश्मिरी पंडितांसाठी सरकारने काय केले? आजही काश्मीरमध्ये परिस्थिती जैसे थेच आहे. ज्या केदारनाथच्या गुहेत तपश्चर्या करतात तिथल्याच मंदिरातील 500 कोटी सोने मोदींनी चोरले. भाजपवाले रामाचे मालक झाले. मात्र आज राम गळक्या छपराखाली कोणी बसवला? असा सवाल राऊतांनी केला आहे.

