उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत वैफल्यग्रस्त झाले आहे. या वैफल्यातूनच ते अशा प्रकारचे शब्द वापरत आहे. त्यावर काय उत्तर देणार? अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. पुणे येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्यावर फडणवीस यांनी देखील पलटवार केला आहे.मुंबईतल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी, एक तर तू राहशील किंवा मी राहिल, असे आवाहन दिले होते. त्यानंतर फडणवीसांनीही पलटवार केला होता. माझ्या माझ्या पायाशी कलिंगड ठेवलेले होते. त्यामुळे काही जणांना वाटले की मी त्यांना आव्हान दिले. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांचा पक्ष. ढेकणाला कधी आव्हान दिले जात नाही, ढेकणं चिरडायची असतात अश शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडवीसांवर टीका केली होती. त्यांच्या टीकेवरुन फडणवीसांनी उद्धव ठाकरे डोके बिघडल्यासारखे बोलत असल्याचे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत वैफल्यग्रस्त झाले आहे. या वैफल्यातूनच ते अशा प्रकारचे शब्द वापरत आहे. त्यावर काय उत्तर देणार? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. अशा प्रकारे वैफल्यातून आणि निरशेतून ते डोके बिघडल्यासारखे बोलत आहेत. अमित शहा यांनी ते औरंगजेब फॅन क्लबचे असल्याचे म्हटले होते, तेच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सिद्ध करत असल्याचा खोचक टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत, हे उद्धव ठाकरे दाखवून देत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे
सचिन वाझे यांनी मला पत्र पाठवले असल्याचे मला माध्यमातूनच कळाले आहे. मात्र, असे काही पत्र आले आहे का? हे मी अद्याप पाहिलेले नाही. तसे काही पत्र आले आहे का, ते मी पाहून नंतर चौकशी करेल. मात्र जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य ती चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सचिन वाझे यांच्या पत्रावरुन महाराष्ट्रात चांगलेच राजकारण तापले असून, या सर्वांची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.