मी ढेकणाला आव्हान देत नाही म्हणत फडणवीसांवरही टीका
पुणे- अहमदशहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा आले होते. पुण्यात येऊन भाषण करुन गेले. त्यांना संघाचे हिंदुत्व मान्य आहे का? असे म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर घणाघात केला आहे. तसेच मी ढेकणाला आव्हान देत नाही म्हणत त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोफ डागली आहे. पुण्यात ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी ठाकरे चांगलेच बरसले होते.यावेळी बोलताना ते म्हणाले, “अहमदशहा अब्दालीचे राजकीय वंशज अमित शहा पुण्यात आले होते. पुण्यात येऊन भाषण करून गेले. त्यांना संघाचे हिंदुत्व मान्य आहे का? चंद्राबाबु नायडू, नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी माणसं आहेत का?. आमचे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व आहे. साधु संतांचे, महाराष्ट्राला पुढे नेणारे आमचे हिंदुत्व आहे”, असे म्हणत कोर्टाला शेवटची विनंती करतो नाहीतर नाद सोडतो” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा लक्ष केले आहे. ते म्हणाले, ”दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या सभेत बोललो की, एक तर तू राहशील किंवा मी राहिल. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलेले होते. त्यामुळे काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिले. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांचा पक्ष. ढेकणाला कधी आव्हान दिले जात नाही, ढेकणं चिरडायची असतात. कुणीतरी हे आव्हान स्वतःवर घेतले. माझ्या नादाला लागू नका असे ते म्हणाले. मी म्हणतो, तुमच्या नादाला लागण्याएवढ्या किंमतीचे तुम्ही तू नाहीच” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.उद्धव ठाकरे म्हणाले,

”गद्दारांनी चोरबाजार मांडला आहे. पुणे, मुंबईत लूट सुरुय. कॉन्ट्रॅक्टरच्या रुपाने पैसा ओरबाडत आहेत. हाचा पैसा निवडणुकीत वापरणार आहेत. शिवसेना म्हणजे भाकड जनता पक्ष नाही. तर अन्याय जाळून टाकणारी मशाल आणि निखारा आहे. त्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर सोपवली आहे. आता जनता न्यायाधीश असून आपल्या शिवसेनेची बाजू मांडणारे तुम्ही शिवसैनिक दूत, वकील आहात. जनता न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे जनता आपल्याच बाजूने न्याय देईल” असा विश्वास देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही भाजपवर सडकून टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, औरंगजेबाच्या बेगमने त्याला विचारले होते जहाँपना तुम्हाला काय मिळवायचे आहे? तेव्हा औरंगजेबाद त्याच्या बेगमला महाराष्ट्र काबीज करणार असे म्हंटलं होता. संपूर्ण देश काबीज करून मी शांतपणे जगायला सुरुवात करेल असे तो म्हणाला होता. तेव्हा त्याची बेगम त्याला म्हणाली, आत्ताच तुम्ही शांतपणे का जगत नाहीत? त्याच्या आयुष्यात तो निवांतपणा आला नाही शेवटी त्याची कंबर इथेच आहे. अशाच प्रकारे भाजपची कबर इथेच खोदली जाणार आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांना जागे करावे लागेल”, असे राऊत म्हणाले. अहमद शहा अब्दाली कोण होता? अहमदशाह दुराणी ऊर्फ अहमदशाह अब्दाली हा दुर्राणी साम्राज्याचा अफगाण संस्थापक होता. आधुनिक काळातील अफगाणिस्तान देशाच्या गाभ्याची बांधणी त्याने स्थापलेल्या साम्राज्यातून झाल्यामुळे तो अफगाणिस्तानाचा जनक मानला जातो. त्याने पाच वेळा भारतीय उपखंडावर आक्रमणे केली. त्याने इ.स. 1761 साली पानिपताच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांना हरवले होते.

