मुंबई- मी 4 पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते, त्यातून जी वस्तूस्थिती समोर आणली. त्यानंतर सचिन वाझे जे बोलले ती देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
दरम्यान अनिल देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, हायकोर्टाने सचिन वाझेबद्दल बोलताना म्हटले की, हा व्यक्तरी गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याला दोन खूनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. आताही एका खूनाच्या गुन्ह्यात अटकेत आहे. त्याच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवण्यासारखा हा व्यक्ती नाही असे हायकोर्टाने म्हटल्याचे देशमुखांनी सांगितले आहे.
अनिल देशमुख म्हणाले की, सचिन वाझेच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे हायकोर्टाने म्हटले असताना त्याला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर वाझेच्या माध्यमातून आरोप लावत आहे.

