जानेवारी 2024 पर्यंतच्या आउटलेट्सच्या संख्येवरून महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख संघटित ज्वेलर्स असलेल्या पी.एन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडला सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्डने (SEBI) प्रस्तावित प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) साठी मान्यता दिली आहे. भारतीय बाजारपेठेतील ही BIS-नोंदणीकृत आउटलेट्सची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
कंपनीच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये प्रत्येकी ₹ 8,500 दशलक्षपर्यंतच्या दर्शनी मूल्याच्या ₹ 10 च्या इक्विटी शेअर्सच्या नवीन इश्यूचा आणि ₹ 2,500 दशलक्षपर्यंत प्रत्येकी ₹ 10 च्या दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा प्रस्ताव आहे. एकूण ऑफरमध्ये प्रत्येकी ₹ 10 च्या दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचा समावेश असून, एकूण दर्शनीमूल्य ₹ 11,000 दशलक्षपर्यंत आहे. विक्रीच्या ऑफरमध्ये SVG बिझनेस ट्रस्ट (प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर) द्वारे ₹ 2,500 दशलक्षपर्यंत प्रत्येकी ₹ 10 च्या दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.
IPO द्वारे उभारलेला निधी महाराष्ट्रात 12 नवीन स्टोअर्स उभारण्यासाठी, तसेच कंपनीने घेतलेल्या काही कर्जाची पूर्ण किंवा काही प्रमाणात परतफेड, तसेच पूर्वपेमेंटच्या खर्चाच्या निधीसाठी वापरण्याचा प्रस्ताव, तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून खर्च करण्याचा विचार आहे.
मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (पूर्वी एडलवाईस सिक्युरिटीज लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) आणि BOB कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

