चिरंजीव परदेशी, रक्षिता राठोड, स्वराज खामकर, आदिती भड, इंद्रजीत माने, आदिती हरगुडे यांचा प्रथम क्रमांक !!
पुणे, १ ऑगस्टः महाराष्ट्रीय मंडळाच्या शेठ दगडूराम कटारिया हायस्कूल तर्फे आयोजित कै. कॅप्टन शिवरामपंत दामले स्मृतिदिनानिमित्त आंतर शालेय क्रॉसकंट्री २०२४ स्पर्धेत चिरंजीव परदेशी, रक्षिता राठोड, स्वराज खामकर, आदिती भड, इंद्रजीत माने आणि आदिती हरगुडे यांनी आपापल्या गटात अव्वल वेळ नोंदवित प्रथम क्रमांक पटकाविला.
मुकूंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या शेठ दगडूराम कटारिया हायस्कूल मैदानावर ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्रीय मंडळाचे सहकार्यवाह श्री. रोहन दामले, बँक ऑफ महाराष्ट्र टीमवी शाखेच्या व्यवस्थापिका अनुराधा मोडक, बँक ऑफ महाराष्ट्रचे रिलेशनशीप व्यवस्थापक भगवान परदेशी, पुणे जिल्हा क्रिडाधिकारी महादेव कसगावडे, राज्य तांत्रिक समितीचे किशोरकुमार शिंदे, वेस्टर्न महाराष्ट्र राज्य तांत्रिक समितीचे अध्यक्ष बॅप्टीस डिसुझा यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील बिशप्स्, डीईएस, आरसीएम गुजराती प्रशाला, मुक्तांगण, सरदार दस्तुर, अभिनव इंग्रजी माध्यम, एस.डी. कटारीया हायस्कूल, सनराईज ग्लोबल स्कूल, समता विद्यालय, म्हातोबा प्रशाला-आळंदी, श्री श्री रविशंकर विद्यालय-भुगांव, रामभाऊ म्हाळगी विद्यालय आंबेगांव-कात्रज अशा शाळेतील सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण महानगर पालिकाचे मुख्य सुरक्षा अधिकारी राकेश विटकर, छत्रपती पुरस्कार विजेते भास्कर भोसले, राखिव पोलिस निरिक्षक किशोरकुमार टेंभुर्णे, अॅथलेटिक्स् राज्य मार्गदर्शक सुरेश काकड, सुधांशु खैरे, युवराज मेमाणे, राजेंद्र घुले, नितीन ढमाले, संजय नाईक आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंना मेडल्स्, प्रशस्तीपत्रक आणि बॅग्ज् देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आभार स्पर्धेचे संयोजक महाराष्ट्रीय मंडळाचे एस डी कटारिया हायस्कूलचे क्रीडा शिक्षक हर्षल निकम यांनी मानले. स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री मनोज पवार यांनी केले. स्पर्धेला बँक ऑफ महाराष्ट्राचे सहकार्य लाभले होते.
स्पर्धेच्या ११ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये चिरंजीव परदेशी (४:४६.०९, महाराष्ट्रीय मंडळ स्कूल) याने पहिला तर, वेदांत रेणुसे (४:४८.०७ एस.डी. कटारीया हायस्कूल) याने दुसरा क्रमांक पटकाविला. वरद भोर (४:४८.७९, सनराईज ग्लोबल स्कूल) याने तिसरा क्रमांक पटकाविला. मुलींमध्ये रक्षिता राठोड (५:१८.०४, मुनलाईट प्रायमरी स्कूल) हिने पहिला, प्राप्ती देशमुख (५:२९.३, समता विद्यालय) हिने दुसरा तर, रिषा निषाद (५:३३.८, ए.पी.एस. पुणे) हिने तिसरा क्रमांक पटकाविला.
१३ वर्षाखालील मुलांमध्ये स्वराज खामकर ((६:२७, एस.पी.एम.) याने पहिला, प्रतिक आव्हाळे (६:२८.८, जे.एस.पी.एम.) याने दुसरा तर, नीरज गवारी (६:३९.५, माध्यमिक विद्यालय पिंपळे-गुरव) याने तिसरा क्रमांक पटकाविला. याच विभागात मुलींमध्ये आदिती भड (७:१२.२, बी.जे.एस. स्कूल) हिने पहिला, प्रांजल थोरात (७:१४.७, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल) हिने दुसरा तर, प्रतिज्ञा मोरे (७:१४.९, समता विद्यालय) हिने तिसरा क्रमांक मिळवला.
१५ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये इंद्रजीत माने (११:४३, न्यु इंग्लिश स्कूल) याने पहिला, हर्षवर्धन पवार (११:५३, न्यु इंग्लिश स्कूल) याने दुसरा तर, स्वराज साळुंखे (११:५८, अचिव्हर इंटरनॅशनल स्कूल) याने तिसरा क्रमांक मिळवला. याच विभागात मुलींमध्ये आदिती हरगुडे (१२:२८, बी.जे.एस. स्कूल) हिने पहिला, श्रद्धा निकम (१२:५८, ह्युम मॅकहेन्री स्कूल) हिने दुसरा आणि नेत्रा मच्चा (१३:३७, सरदार दस्तुर स्कूल) हिने तिसरा क्रमांक मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकालः (नाव, वेळ, शाळेचे नाव या क्रमानुसार)ः
११ वर्षाखालील मुलेः १ किलोमीटरचा धावमार्गः
१) चिरंजीव परदेशी (४:४६.०९, महाराष्ट्रीय मंडळ स्कूल);
२) वेदांत रेणुसे (४:४८.०७, एस.डी. कटारीया हायस्कूल);
३) वरद भोर (४:४८.७९, सनराईज ग्लोबल स्कूल);
४) अभिराज्य चव्हाण (४:४९.०३, ए.पी.एस. पुणे);
५) हरगुन सिंग (४:५१.०८, ए.पी.एस. पुणे);
६) राजवर्धन सुर्यवंशी (४:५२.०२, काशी विश्वेश्वर स्कूल);
७) आरूष दिघे (४:५६.०६, भारती विद्यापीठ);
८) प्रितेश भोसले (४: ५८.०१, राधाकृष्ण विद्यालय);
९) अनुज बर्वे (४: ५८.०६, ए.पी.एस. पुणे);
११ वर्षाखालील मुलीः १ किलोमीटरचा धावमार्गः
१) रक्षिता राठोड (५:१८.०४, मुनलाईट प्रायमरी स्कूल);
२) प्राप्ती देशमुख (५:२९.३, समता विद्यालय);
३) रिषा निषाद (५:३३.८, ए.पी.एस. पुणे);
४) मोनी कुमार (५:३९.६, समता विद्यालय);
५) आरोही आव्हाळे (५:४३.४, बी.जे.एस.);
६) आरोही गारगोटे (५:५५.३, ए.पी.एस. पुणे);
७) मधुरा पाटील (६:०१.७, एच.ए. स्कूल);
८) प्रणिती शिंदे (६:१२.६, समता विद्यालय);
९) अफ्रिन खान (६:१५.४, समता विद्यालय);
१३ वर्षाखालील मुलेः २ किलोमीटरचा धावमार्गः
१) स्वराज खामकर (६:२७, एस.पी.एम.);
२) प्रतिक आव्हाळे (६:२८.८, जे.एस.पी.एम.);
३) नीरज गवारी (६:३९.५, माध्यमिक विद्यालय पिंपळे-गुरव);
४) अर्णव पवार (६:४१.७, डि.ई.एस स्कूल);
५) श्रेयस नवसुपे (६:५५.१, बी.जी.एस.);
६) यश चंदनकर (७:०१.२, समता विद्यालय);
७) राजवर्धन शेडगे (७:०५.३, एस.एस.आर.व्ही.एम)
८) अधिराज सर्वगोड (७:१४.४, एसएसआरव्हीएम);
९) ध्रुव सावंत (७:१६.९, दस्तुर विद्यालय);
१३ वर्षाखालील मुलीः २ किलोमीटरचा धावमार्गः
१) आदिती भड (७:१२.२, बी.जे.एस. स्कूल);
२) प्रांजल थोरात (७:१४.७, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल);
३) प्रतिज्ञा मोरे (७:१४.९, समता विद्यालय);
४) अधिरा पवार (७:१५.२, माऊंट कार्मिल स्कूल);
५) केसर पुजारी (७:२२.६, अचिव्हर इंटरनॅशनल स्कूल);
६) तन्वी वरपे (७:२३.१, बी.जे.एस. स्कूल);
७) अर्वा स्वामी (७:२३.३, बीएसएसएम स्कूल);
८) रिद्धी बिसे (७:३८.६, सिंहगड सिटी स्कूल);
९) आकांक्षा कारंडे (७:४०.३, बी.जे.एस. स्कूल);
१५ वर्षाखालील मुलेः ३ किलोमीटरचा धावमार्गः
१) इंद्रजीत माने (११:४३, न्यु इंग्लिश स्कूल);
२) हर्षवर्धन पवार (११:५३, न्यु इंग्लिश स्कूल);
३) स्वराज साळुंखे (११:५८, अचिव्हर इंटरनॅशनल स्कूल);
४) श्रवण गाढवे (१२:१७, न्यु इंग्लिश स्कूल);
५) साहील जाधव (१२:२३, एसडी कटारीया हायस्कूल);
६) श्लोक जाधव (१२:२४.२, एसडी कटारीया हायस्कूल);
७) अर्थव गोंडे (१२:२४.५, सरस्वती विद्या मंदीर);
८) इंद्रजीत इंगळे (१२:२४.८, एसडी कटारीया हायस्कूल);
९) सागर सजगणे (१२:३७, राधाकृष्ण विद्यालय);
१५ वर्षाखालील मुलीः ३ किलोमीटरचा धावमार्गः
१) आदिती हरगुडे (१२:२८, बी.जे.एस. स्कूल);
२) श्रद्धा निकम (१२:५८, ह्युमे मॅकहेन्री स्कूल);
३) नेत्रा मच्चा (१३:३७, सरदार दस्तुर स्कूल);
४) आदिती तांबे (१४:०४, ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल);
५) गायत्री केंद्रे (१४:१३, समता विद्यालय);
६) कल्याणी सिद्धेश्वर (१४:३५, बी.जे.एस. स्कूल);
७) आयुष्का आव्हाळे (१४:४७, जेएसपीएम स्कूल);
८) प्राची मुरमुरे (१५:२९, दामले प्रशाला);
९) दक्क्षा नहार (१६:१२, विजयवल्लभ स्कूल);