पिंपरी, पुणे (दि. १ ऑगस्ट २०२४) संसदेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या बाबत खा. अनुराग ठाकूर आणि सांबित पात्रा यांनी अनुद्गार काढले त्याच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत. खा. ठाकूर आणि पात्रा यांनी याविषयी देशाची माफी मागावी अशी मागणी शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पिंपरी येथे केली.
डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात गुरुवारी सायंकाळी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ठाकूर आणि पात्रा तसेच भाजप सरकारच्या विरोधी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.
डॉ. कदम निषेध व्यक्त करताना म्हणाले की, ठाकूर यांच्या तोंडून मनुवादी आणि जातीयवादी शब्द बाहेर पडले आहेत. जाती धर्मात द्वेष निर्माण करून देशात अस्थिरता निर्माण करून छुपा अजेंडा राबविण्याचे भाजपचे धोरण आहे.
यावेळी भाऊसाहेब मुकुटमल, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, अशोक काळभोर, मेहबूब शेख, वाहब शेख, मकरध्वज यादव, मयूर जयस्वाल, शहाबुद्दीन शेख, प्रा. किरण खाजेकर, ॲड. अशोक धायगुडे, अमर नाणेकर, अक्षय शहरकर, बाबा बनसोडे, गणेश गरड, सोमनाथ शेळके, जॉर्ज मॅथ्यू, वसंत वावरे, अर्चना राऊत, ॲड. अनिकेत राऊत, ॲड. मोहन अडसूळ, भारती घाग, सुनिता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, बबीता ससाणे, गणेश बनपट्टे, अमित मोरे, राहुल शिंपले, सतीश भोसले, गणेश शेलार, मिलिंद फडतरे, बसवराज शेट्टी आदी उपस्थित होते.