नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना,लोकमान्य टिळकांना अभिवादन

Date:

पुणे- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही आज सकाळी सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच, सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कार्यातून समाजाला एक दिशा दिली. विशेष करुन कामगार वर्गामध्ये आत्मविश्वास निर्माण करुन, त्यांना समाजात एक स्थान मिळवून दिले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांच्या विपुल साहित्याचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या कार्यातून समाजबांधवांनी प्रेरणा घेऊन समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा; यासाठी कार्य करावे. त्यासाठी शासनाकडून ही सर्वतोपरी मदत मिळेल” अशी भावना व्यक्त केली.

दरम्यान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महापुरुष अभिवादन समितीच्या वतीने आयोजित एकता मिसळ मध्येही नामदार पाटील यांनी सहभाग घेत सर्वांसह मिसळचा आस्वाद घेतला. तसेच,समितीने सुरु केलेल्या ‘पुस्तक दान’ उपक्रमाचे देखील कौतुक केले.

“पुस्तके ही मानवी जीवन घडवणारी संपदा आहे. वाचनामुळे चांगली पिढी घडण्यास मदत होते. महापुरुष अभिवादन कृती समिती आणि लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येत असलेला ‘वाचन चळवळ’ हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त केली.

यावेळी माजी आमदार दीपक पायगुडे, भाजप नेते हेमंत रासने, भाजपा कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, कुणाल टिळक, धनंजय जाधव, प्रल्हाद गवळी यांच्यासह अनुयायी उपस्थित होते.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना सर्वच स्तरातून अभिवादन करण्यात येत आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सकाळी केसरी वाड्यात जाऊन लोकमान्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी भाजप नेते हेमंत रासने, प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, धनंजय जाधव, प्रल्हाद गवळी यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. लोकमान्यांच्या समाज आणि देशाप्रती निस्वार्थ भावनेतून, न्याय आणि अतूट बांधिलकीतून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे, अशी भावना नामदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ.नंदकिशोर कपोते यांच्या कथक नृत्य कार्यक्रमास बँकाॅक येथे मोठा प्रतिसाद

पुणे : सुप्रसिद्ध कथक नर्तक डॉ.नंदकिशोर कपोते आणि त्यांच्या...

२०३० पर्यंत पुण्यात ४० हून अधिक हॉटेल्स आणि १२०० हून अधिक कीजसह ऑलिव्हची पुढील मेट्रो पॉवरहाऊस योजना

पुणे – एम्बसी ग्रुपचा तंत्रज्ञानाधारित हॉस्पिटॅलिटी ब्रँड ऑलिव्ह बाय एम्बसीने...

आठवणींना पुस्तक रूपाने शब्दबद्ध करण्याचा आनंद मोठा- डॉ. मुकेश शर्मा.

पुणे-आपण शेकडो लोकांना भेटत असतो. त्यांचे निरीक्षण करीत त्यांच्या...

10 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान पत्रकार भवन येथे ‘पासपोर्ट मोबाईल व्हॅन’ या उपक्रमाचे आयोजन

पुणे- पुणे येथील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाच्या वतीने (आरपीओ) मंगळवार, दिनांक...