पुणे-पुण्यातील अनधिकृत बांधकामे,नदी नाल्यांवर पूररेषेतील अतिक्रमणानी निसर्गावर रोज अत्याचार होत असल्याचा आणि त्याचा मानवी जीवनावरही परिणाम होत असल्याचा मुद्दा आज खासदार मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत उपस्थित केला
पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागांना अतिवृष्टीचा फटका बसला. अनेक शहरांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळित झाले.या संदर्भात केंद्र शासनाने पुनर्वसन निधी द्यावा तसेच शहरांचा नियमानुसार विकास होण्यासाठी नियंत्रण ठेवावे यासारख्या काही मागण्यांसाठी आज राज्यसभेत शून्य काळात मुद्दा उपस्थित केला.मोठ्या शहरांमध्ये वाढलेल्या अनधिकृत बांधकामामुळे, नाले बुजवणे- वळवणे, पूररेषेतील अनाधिकृत बांधकामे यामुळे नदी आणि निसर्गाचे जे नुकसान होत आहे, त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.वरील मुद्द्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी व प्रामाणिक करदाते , शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा अशी मागणी केली.