पोलिसांची जरब बसत नाही …तोपर्यंत पुरुष थांबणार नाहीत:मंदिरातील पुजाऱ्यांकडूनही अत्याचार; राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचा संताप
मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी यशश्री शिंदेच्या कुटुंबाची तिच्या घरी भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. या वर्षीच नारी शक्ती कायदा पास करावा अशी मागणी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच पोलिसांची दहशत बसत नाही, तोपर्यंत पुरुष थांबणार नाही असे त्या म्हणाल्या आहेत. घडलेल्या घटनांप्रकरणी त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, ”पोलिसांवर आमची प्रचंड नाराजी आहे. यशश्री शिंदेंच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी येत असताना माझ्या समोर अशीच एक तिसरी घटना समोर आली. मुलीने नकार दिला म्हणून तिला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. अशा प्रकरणात पोलिसांना कुठलाही राजकीय पक्ष अडवणार नाही. ज्याप्रकारे पोर्श कार अपघात प्रकरणात कुणीतरी आमदार गेले होता, तसे इथे कुणीही येणार नाही. पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे, पोलिसांनी आपली दहशत दाखवून दिली पाहीजे”, अशी मागणी त्यांनी केली आहे.पुढे बोलतांना त्या म्हणाल्या, ”हिंस्रपद्धतीने मुलींवर अत्याचार होत आहेत. निर्भया प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला सोडण्यात आले, हे चुकच आहे. ज्या मुलामध्ये इतकी विकृती आहे, त्याला आयुष्यभर तुरुंगात ठेवावे किंवा थेट फाशीच द्यावी. मंदिरातील पुजारीही जर महिलांवर अत्याचार करत असतील, मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करत असतील तर त्यांच्यावर पोलिसांची दहशत असली पाहीजे. पोलिसांची दहशत बसत नाही, तोपर्यंत पुरुष थांबणार नाही”, असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले आहे.
दहा वर्षांपासून शक्ती कायदा मंजूर झालेला नाही. आमची पंतप्रधानांना विनंती आहे की, तुम्ही एका वर्षात शक्ती कायदा मंजूर करा. त्याची अंमलबजावणी होते की नाही? याचीही तपासणी करा. अशा गुन्ह्यातील गुन्हेगारांना वरच्या न्यायालयात जाण्याची मुभा न देता तात्काळ शिक्षा करा”, असे त्या म्हणाल्या. तसेच यशश्री शिंदे प्रकरणात लव्ह जिहादचा आरोप केला जात आहे. शर्मिला ठाकरे यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, अशा घटनांमध्ये धर्म आमता कामा नये. शिळफाटा येथील घटनेत मंदिरातील पुजाऱ्यांनी महिलेवर बलात्कार केला. असे गुन्हे करणाऱ्या पुरुषांना धर्म नसतो असे मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.