पुणे-महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज हे दबावाला बळी पडताना दिसत असून यामुळे अन्य अधिकारी बळीचे बकरे ठरत असल्याचे चित्र महापालिकेत दिसून येते आहे.आरोग्य खात्यासह सर्वच खात्यात दिसणाऱ्या या चित्रामुळे अधिकाऱ्यांचे संघटीत संरक्षण आता कमकुवत झाल्याचे मानले जाऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर आज सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाई विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न झाला.महापालिका अधिकाऱ्यांची काम करताना होत असलेली गळचेपी आता केंद्रीय स्तरावर पोहोचली असून तिथूंचा या धीकार्यांना काय मदत मिळते हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान शहरात निर्माण झालेल्या पुरस्थितीला जबाबदार धरत सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना महापालिका आयुक्तांनी निलंबित केले आहे. तसेच बऱ्याच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हे निलंबन मागे घेण्याची मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी आज महापालिकेत काळ्या फिती लावून आंदोलन केले. निलंबन त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी पीएमसी एंप्लॉईज युनियन ने महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. अशी माहिती युनियन चे अध्यक्ष बजरंग पोखरकर यांनी दिली. याबाबत पोखरकर यांनी सांगितले की, पीएमसी एम्प्लॉईज युनियनचे वतीने १८ जुलै रोजी विविध प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन केले होते. झालेल्या आंदोलनाची दखल घेऊन अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांनी ८ दिवसामध्ये योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिलेले होते. मात्र अद्यापही त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. तथापि, असे असतानाही पुणे मनपा मंडई विभागाकडील लिपिक टंकलेखक हुद्द्यावरील यमुना करवंदे, संदीप चरण, सिध्दार्थ मुलतानी, मंथन चव्हाण व आकाशचिन्ह व परवाना विभागाकडील लिपिक टंकलेखक हुद्द्यावरील मिलिंद पांगारे भारत गायकवाड या सेवकांचे तसेच विधी विभागाकडील लिपिक टंकलेखक हुद्द्यावरील सेवकाचे प्रशासनाकडून निलंबन करण्यात आलेले आहे.पोखरकर यांनी पुढे सांगितले की, त्याचप्रमाणे सिंहगड क्षेत्रिय कार्यालयाकडील सहायक महापालिका आयुक्त संदीप खलाटे यांनी पूरग्रस्त भागामध्ये मनपा यंत्रणेसह प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रामाणिकपणे काम करूनही २६ जुलै रोजी त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलेले आहे. याविषयी पुणे मनपा सेवकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे आज निषेध व्यक्त करणेसाठी सर्व पुणे मनपा सेवक काळ्या फिती लावून कामकाज करीत आहोत. तसेच वरील सर्व सेवकांचे निलंबन प्रशासनाने त्वरित मागे घ्यावे अशी मागणी पुणे मनपा सेवकांकडून करण्यात आली आहे. सर्व सेवकांचे निलंबन प्रशासनाने त्वरित मागे घेऊन सहकार्य करावे. असे पोखरकर यांनी म्हटले.

