Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

 मुंबई विमानतळावर 20 किलो सोने, गांजा आणि विदेशी चलन केले जप्त

Date:

 मुंबई-विमानतळ आयुक्तालय, मुंबई कस्टम झोन-III ने 13.11 कोटी रूपये किमतीचे 20.18 किलोपेक्षा जास्त सोने, 4.98 किलो गांजा (मारिजुआना) आणि  96 लाख रुपये किमतीचे परकीय चलन जप्त केले आहे.  15-27 जुलै 2024 दरम्यान 39 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये  मेणातील सोन्याची धूळ, अंतिम हात न फिरवलेले दागिने आणि सोन्याचे बार अशा विविध स्वरूपातील सोने पुठ्ठ्याचे बॉक्स, कागदांचे गठ्ठे, बुटांचे सोल यात लपवलेले आढळले. अशा पद्धतीने शरीरात सोने लपवलेल्या सात प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

दिल्लीच्या वसंत विहार येथील रहिवासी असलेल्या एका भारतीयाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या चेक-इन बॅगेजमध्ये प्लास्टिकच्या 14 एकसमान पारदर्शक पाकिटात गांजासदृश (मारिजुआना)  हिरवट रंगाचा पदार्थ तीन लहान कार्डबोर्ड बॉक्समध्ये लपवून ठेवलेला आढळून आला. हा पदार्थाचे वजन 4977 ग्रॅम होते. दुबईहून 2, जेद्दाहहून, शारजाह, कोलकाता आणि अहमदाबादमधून आलेल्या प्रत्येकी एक अशा सहा भारतीय नागरिकांकडे 24 कॅरट सोन्याची धूळ, 24 कॅरट गोल्ड बार आणि 24 कॅरट सोन्याची तार रोडियम आढळून आली. त्यांचे एकूण वजन 7160 ग्रॅम होते. वायरमधील सामानाभोवती, एलईडी ड्रायव्हर्सच्या प्लास्टिक केसेसमध्ये आणि शरीरात ते लपवून ठेवले होते. या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

याशिवाय, दुबई (03) आणि कोलंबो (01) येथून आलेल्या  चार परदेशी नागरिकांना रोखण्यात आले आणि त्यांच्याजवळ विजारी (पॅन्ट)च्या खिशात, तसेच सामानवाहू हातगाड्यांमध्ये (ट्रॉली) लपवून ठेवलेली एकूण 1197.00 ग्रॅम वजनाची 24 कॅरट सोन्याची पूड आणि सोन्याच्या लडी, असा ऐवज सापडला.

दुबई (12), बहरीन (02), दोहा (02), हाँगकाँग (01), शारजा (01), सिंगापूर (01), बँकॉक (01), अबू धाबी (01) आणि जेद्दाह (01) येथून आलेल्या 22 भारतीय नागरिकांना  रोखण्यात आले. त्यांच्यापाशी, 7685.00 ग्रॅम सोने आणि 30 आय-फोन असा एकूण 44,92,300 रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडला. हा माल चप्पलच्या तळव्याच्या आत, कागदाच्या दोन थरांमध्ये, दोन PS-4 गेमिंग कन्सोलच्या मदरबोर्डच्या खाली, सामान वाहून नेणाऱ्या हातगाडीच्या पुढील चाकाजवळ आणि शरीरावर लपवून ठेवलेल्या अवस्थेत होता.

एअर इंडिया एक्स्प्रेस IX-252 आणि IX-296 या विमानांच्या सीमाशुल्क तपासणी  दरम्यान, 4140.000 ग्रॅम एकूण निव्वळ वजनाची, 2,70,47,655 रुपये किंमतीची, मेणातील 24 कॅरट सोन्याची पूड (05 पुड्या) सापडली. हा ऐवज, विमानातील आसनांच्या पोकळ नळकांड्यांमध्ये आणि आसनांच्या खाली असलेल्या कप्प्यांमध्ये लपवून ठेवलेला आढळून आला.

सिंगापूर, अबुधाबी आणि बँकॉक येथे जाणाऱ्या 8 भारतीय नागरिकांना रोखण्यात आले. त्यांच्यापाशी 62500 युरो, 50,000 अमेरिकी डॉलर,  25210 थाई बाथ आणि 97 सिंगापूर डॉलर, असे एकूण 96,41,993 रुपयांचे परकीय चलन सापडले. हे चलन या प्रवाशांनी, चेक इन बॅगेज (विमानात बसताना जवळ न बाळगता येणारे स्वतःचे सामान) मधल्या भांड्यांमध्ये, चपलांच्या  तळव्यांखाली आणि पापडाच्या थरांमध्ये लपवले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सातव्या दिवशीही 200+ उड्डाणे रद्द:सर्वोच्च न्यायालयाचाही याचिकेवर सुनावणीस नकार

मुंबई- देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोचे उड्डाण सोमवारी...

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...