Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने सायबर फसवणुक करणा-या टोळीच्या गुजरातला जाऊन मुसक्या बांधल्या

Date:

पुणे- फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने सायबर फसवणुक करणा-या टोळीच्या गुजरातला जाऊन पुणे पोलिसांनी मुसक्या बांधल्या.नाकर रोनक आश्विनभाई वय-२८ वर्षे ,शहा मोहितकुमार दिनेशभाइ वय-२७ वर्षे,सोधा दिव्यराजसिंग अमरसंग वय-२४ वर्षे अशी अटक केलेल्या भामट्यांची नावे असून गुजरातच्या भूज मध्ये त्यांना पकडण्यात आले.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’या प्रकरणातील फिर्यादी यांना दि.१५/०१/२०२४ ते ०७/०२/२०२४ या कालावधीत अनोळखी व्यक्तीने टेलिग्रामव्दारे संपर्क साधून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवुन देतो असे सांगुन सुरुवातीला तक्रारदार यांना चांगला परतावा मिळवुन देवुन तक्रारदार यांचा विश्वास संपादून करुन त्यांचेकडुन मोठ्या प्रमाणावर फॉरेक्स ट्रेडिंग करिता २८,००,०००/- रुपये (२८ लाख रुपये) वेगवेगळ्या बँक खात्यावर प्राप्त करुन घेतले. पैसे प्राप्त झाल्यानंतर तक्रारदार यांना नफा तसेच मुळ रक्कम मात्र परत दिली नाही आणि गायब झाले. तक्रारदार यांची ऑनलाईन आर्थिक फसवणुक झाल्यामुळे चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि क्र. १७५/२०२४ अन्वये कलम ४०९,४१९,४२०,३४ भादवि सह कलम ६६ सी, डी आयटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने तक्रारदार यांचे फसवणुक झालेल्या पैशाबाबत तसेच बँक खाते धारकाबाबत माहिती घेतली असता सदरचा बँक खाते धारक हे भूज, गुजरात या राज्यातील असल्याचे समजुन आले. सदर बँक खात्याला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांक व जीमेल आयडीची माहिती घेतली असता सदरचे मोबाईलचे लोकेशन व जीमेलच्या आयपी अॅड्रेसवरुन प्राप्त झालेल्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन हे भूज, गुजरात राज्यामधील येथील असल्याचे समजुन आल्याने सदर ठिकाणी चंदननगर पोलीस स्टेशन येथील सायबर पथकाचे पोउपनि रामेश्वर रेवले, पोलीस अंमलदार उकिर्डे, पानपाटील हे तिथे तपासकामी जावुन प्राप्त मोबाईल क्रमांकाचे लोकेशन नुसार सिटी ए डिव्हीजन पोलीस स्टेशन, भूज, गुजरात येथील स्थानिक पोलीसांची मदत घेतली. आणि फसवणुक करणा-या मोबाईल धारक १) नाकर रोनक आश्विनभाई वय-२८ वर्षे रा. कैलासनगर शिव मंदिर बाजूला एसटी वर्क शॉपजवळ भूज, गुजरात यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचे इतर साथीदार शहा मोहितकुमार दिनेशभाई, सोधा दिव्यराजसिंग अमरसंग, व इतर यांचे मदतीने सदर गुन्हा केल्याचे सांगितले. त्याचे साथीदार यांचा स्थानिक पोलीसांच्या मदतीने शोध घेतला असता आरोपी नामे २) शहा मोहितकुमार दिनेशभाइ वय-२७ वर्षे रा. वनिया व्यास अंगिया मोठा नखतराणा जिल्हा. कच्छ ३) सोधा दिव्यराजसिंग अमरसंग वय-२४ वर्षे रा. कोठारा ता. हावडासा जिल्हा. कच्छ हे मिळून आल्याने त्यांचेकडे विचारपुस करुन त्यांचा गुन्हयामध्ये सहभाग असलेबाबत निषन्न झाल्याने त्यांना नमुद गुन्हयात सिटी ए डिव्हीजन पोलीस स्टेशन येथे दि.१७/०७/२०२४ रोजी अटक केली.
सदरची कामगिरी ही पोलीस उपआयुक्त परि ०४, विजयकुमार मगर, सहा पोलीस आयुक्त विठठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल माने यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रामेश्वर रेवले, उकिर्डे, पानपाटील, वानखडे, डहाळे, थोरात यांनी केली..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बेळगावी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे   14 डिसेंबरला अनावरण

मुंबई- केंद्रीय दूरसंवाद तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य एम....

खडकवासल्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर विधानसभेत आ. तापकीरांची लक्षवेधी –

पुण्यासाठी स्वतंत्र ट्रॅफिक प्लॅनर पद व समन्वय समिती स्थापनेचे...

चंद्रकांतदादा पाटील यांची वाचनप्रेमी कोथरुडकरांसाठी आनंदाची बातमी

कोथरुड मतदारसंघातील वाचकांसाठी विशेष सवलत योजना पुणे-तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या...

निगडी ते चाकण व्हाया वाकड मेट्रो ‘डीपीआर’ मंजुरीसाठी आ. शंकर जगताप यांच्याकडून मागणी!

चापेकरवाडा पुनर्विकास प्रकल्प; जलनिस्सारण प्रकल्प, जकात अभय योजनेबाबत मांडल्या...