पुणे –बुधवारी कात्रज येथून पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांना आज सकाळी दहा वाजता मनपा भवनालगत असलेल्या डेंगळे पुलाखाली पाण्यात आढळून आला. अग्निशमन दलाचे जवान यांनी जीवरक्षक राजू काची यांच्या मदतीने या युवकाचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला.शहरात झालेला मुसळधार पाऊस आणि आलेले पाणी यामुळे त्यादिवशी सायंकाळी कात्रज लेकटाऊन येथून एक युवक अक्षय साळुंखे (वय २६) वाहून गेल्याची नोंद अग्निशमन दल नियंत्रण कक्षात सायंकाळी सहाच्या सुमारास झाली होती.
त्यानूसार त्याचवेळी अग्निशमन दलाकडून प्रथम गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून वाहन पाठवत शोध घेण्यात आला होता. परंतू, धरण क्षेत्रातून वाढता विसर्ग व पाण्याचा प्रवाह पाहता अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यादिवशी शोध घेऊन ही युवक सापडला नाही. दुसऱ्या दिवशी दलाने घटनेचे गांभीर्य ओळखून गंगाधाम व कात्रज अग्निशमन वाहन लेकटाऊन व जनता अग्निशमन वाहन शंकर महाराज मठाजवळ, स्वामी विवेकानंद पुतळा आणि आज कसबा येथील वाहन मनपा जवळील नदीपात्र येथे रश्शी, गळ, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग याचा वापर करत युध्दपातळीवर शोधकार्य करीत होते. त्याचवेळी आज सकाळी दहा वाजता मनपा भवनालगत असलेल्या डेंगळे पुलाखाली एक मृतदेह पाण्यात आढळून येताच अग्निशमन दलाचे जवान यांनी जीवरक्षक राजू काची यांच्या मदतीने या युवकाचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
सदर घटनेत अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव, प्रदिप खेडेकर, सुनिल नाईकनवरे, कमलेश चौधरी आणि सुमारे वीसच्या आसपास जवान यांनी शोध मोहीम राबविली घ