बांधकाम व्यवसायिकांना कामगारांच्या सुरक्षाविषयक तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन

Date:

पुणे, दि. २६ : जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायिकांनी इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व नियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ अंतर्गत आपल्या आस्थापनेत कार्यरत बांधकाम कामगारांच्या आरोग्य व सुरक्षाविषयक तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन कामगार उप आयुक्त अभय गिते यांनी केले आहे.

बांधकाम आस्थापना मालकांनी मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना किंवा अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यादृष्टीने कामगारांना सुरक्षाविषयक सर्व साहित्य, साधने उपलब्ध करुन द्यावीत. बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या राहण्याची सोय सुरक्षित ठिकाणी करुन त्यांना आवश्यक त्या सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. बांधकाम व्यवसायिकांनी सुरक्षा परिक्षण (सेफ्टी ऑडीट) पूर्ण करुन घ्यावे. त्याकरीता सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करुन त्याला सतर्क राहाण्याच्या सूचना द्याव्यात.

बांधकाम आस्थापना मालकांनी नोंदीत बांधकाम कामगारांनाच कामावर नेमावे. अनोंदीत कामगार असल्यास प्राधान्याने त्यांची नोंदणी करुन त्यांची खातरजमा व्यक्तीशः करावी. ज्यांच्याकडे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कामगार, कर्मचारी मिळून एकूण १० पेक्षा अधिक असतील, अशा नोंदीत न झालेल्या मालक, नियोक्तानी https://lms.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर तसेच आपल्या आस्थापनेत कार्यरत बांधकाम कामगारांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या https://mahabocw.in या संकेतस्थळावर करावी.

मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात, त्या सर्व योजनांचे लाभ बांधकाम कामगारांना मिळण्याच्यादृष्टीने त्यांना सहकार्य करावे. अधिक माहितीकरीता कामगार उप आयुक्त कार्यालय, शक्ती चेंबर्स, स. नं. ७७/१, २ रा व ३ रा मजला, संगमवाडी, पुणे-३ येथे संपर्क साधावा,असे आवाहनही श्री.गिते यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

इन्फिस्को शेअर मार्केट कंपनीच्या भुपेश अशोक दिक्षीतवर गुन्हा दाखल

पुणे- कोरेगाव पार्क येथील इन्फिस्को शेअर मार्केट...

शहरी सहकारी बँकांची कर्जपुरवठ्यातील भूमिका विस्तारली; पाच वर्षांत थकबाकी जवळपास दुप्पट

● 8 प्रमुख कर्जउत्पादनांमध्ये एकूण कर्जवाटपापैकी 83% हिस्सा केंद्रित असून, त्यात व्यावसायिक कर्जांचा सर्वाधिक 30% वाटा...

मेट्रो स्लॅबच्या दुर्घटनेची जबाबदारी तथाकथीत विकास पुरुष देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. १४ फेब्रुवारी..वडाळा-कासारवडवली मुंबई मेट्रो- ४ या ग्रीन...

मेट्रोचा स्लॅब रोडवर कोसळला:ऑटो, कारचा चेंदामेंदा; 1 जण ठार, 3 जण जखमी

मुंबई-मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळून 1 जण ठार व 3...