मनसेच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचेही केले स्वागत
मुंबई- विधानसभेत भाजपने किती जागा लढवाव्यात यावर वरिष्ठ मंडळी जो काय योग्य तो निर्णय घेतील. यावर माझे काहीही म्हणणं नाही. परंतु मला असे वाटते की भाजपने 288 जागा लढवायला हव्या आहेत, असे मत नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले आहे.या निर्णयावर बोलतांना नारायण राणे म्हणाले की, राज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. परंतु त्यांचा हा निर्णय मी आता पहिल्यांदाच ऐकत असल्याचेच ते म्हणाले. त्यासोबतच ते कोणत्या जागा लढवणार, हा त्यांचा स्वतःचा प्रश्न असल्याचेही ते म्हणालेत.
दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण येत्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर 250 जागा लढवणार असल्याचे काल बोलतांना सांगितले आहे. राज ठाकरे यांच्या या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गट अडचणीत आल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या मनसेची मनधरणी सुरू असल्याच्या चर्चाही होत आहेत. त्यामुळे येत्या काळात राज ठाकरे लोकसभेप्रमाणेच महायुतीसोबत जाणार की विधानसभा निवडणूक एकट्यानेच लढणार आहेत, हे महत्त्वाचे ठरणार आहेत.दीपक केसरकर यावर बोलतांना म्हणाले की, राज ठाकरे यांनी आम्हाला लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिला होता. मोदींनी केलेला विकास त्यांना आवडतो. राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक असल्याचेही ते म्हणाले. त्यासोबतच त्यांचे विचार आमच्याशी मिळतेजुळते आहेत. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना महायुतीत घेण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना चांगल्या भाषेत बोलता येत नाही. त्यांच्या काळातले बजेट माझ्याकडे आहे. त्यांनी काय दिवे लावले ते समजेल. आता साडे चार लाखांचं बजेट राज्याकडे आहे. यांना त्यावेळी कळलं का कितीची तूट आहे? हा आमचा सर्व समावेशक अर्थ संकल्प आहे. उद्धव ठाकरे यांना बजेट वाचायचं असेल तर मी टिपण देईन. प्रत्येक योजनेंतर्गत एक बजेट आहे. राज्याला योजना दिल्या जातात. सर्व योजना राज्यात आहेत आणि मोदी सरकारने दिल्यात. अज्ञानी राहुल गांधी बजेटवर बोलले. आम्ही बजेट मांडून लोकांना लाभ दिलाय. तुम्ही तर राजकोषीय तूट वाढवून दाखवली, असंही नारायण राणे यांनी नमूद केलं.

