आबा बागुलांचे सवाल
पुणे- केली तरी कोणी पुण्यनगरी ची तुंबानगरी ? कोट्यावधींची माया कोणाच्या गेली घरी ? असे सवाल करत शहरातील पावसाळी गटार लाईन (स्ट्रोम लाईन) साठी कोट्यावधी रुपये खर्चाचे वार्ड निहाय ऑडीट करण्याची मागणी महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी केली आहे.
बागुल म्हणाले,’ आता पुणेकर झाले तुंबा, शहरातील विविध भागात, सोसायट्यामध्ये पाणी साचून पुणे शहर तुंबा झाले आहे. हे आता नित्याचे झाले आहे. यातून पुणेकरांची सुटका कधी होणार आहे. शहरात पावसाळी गटारांची कामे खरच झाली आहेत का? की फक्त कागदोपत्रीच ह्या पावसाळी वाहणी दिसत आहेत याचे सर्व वार्ड नुसार ऑडीट होणे गरजेचे आहे. पुणे शहरात अनेक दिवस पाणी तुंबत आहे. याची वारंवार तक्रार करून देखील महानगरपालिका आयुक्त व प्रशासनाला कुंभकर्ण सारखी झोप लागली आहे. पुणेकरांच्या घरात पाणी शिरत आहे. त्यांचे संसार उद्वस्त होत आहेत. सर्व सोसायट्या, झोपडपट्ट्यामध्ये पाणी शिरत आहे. आणि आपण कुंभकर्ण प्रमाणे झोप काढत आहात. याला जबाबदार कोण ? गेल्या पाच सात वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे एक हाती सत्ता महानगरपालिकेवर असून त्यांनी कोट्यावधी रुपये हे फक्त पावसाळी गटार टाकण्यासाठी खर्च केले परंतु पावसाळी लाईन जागेवर असती तर तुंबानगरी पुण्याची झाली नसती. जागेवर पावसाळी गटार लाईन टाकलेलीच नाही. ती अस्तित्वात नाहीच, नाल्यापर्यंत पोहोचलेली नाही. याचे ऑडीट होणे गरजेचे आहे. वारंवार त्या लाईन साफसफाई करणे यावर अब्जो रुपये आत्तापर्यंत खर्च केले आहेत. तरी पुण्यनगरी तुंबानगरी का होत आहे? या महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांनी हा त्रास नाहक का सहन करावा? नागरिक करोडो रुपयांचा टॅक्स व जीएसटी भारतात तरी देखील त्यांना हा त्रास का? आता पाऊस सतत पडतोय तो मुसळधार नाही तरी नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. घरे वाहून जात आहेत. याला जबाबदार कोण? याचे आयुक्तांनी उत्तर द्यावे.
याच्या अगोदर अशी परिस्थिती कधीही नव्हती. पावसाळी गटार लाईन टाकण्याच्या खाली आपल्या घरात पावसाचा पाऊस पडून घेणारे हे शुक्राचार्य कोण आहेत? याचा शोध घेण्यासाठी प्रत्येक वार्ड निहाय ऑडीट करावे अशी आबा बागुल यांनी मागणी केली. पैसे खायचेत तर खा परंतु तुमच्या मुळे निष्पाप पुणेकरांना होणारा त्रासातून मुक्त करा अशी आबा बागुलांनी तळमळीने व्यथा व्यक्त केली.

