मुसळधार हाय लाईट्स…दरडी कोसळल्या, पुल पाण्याखाली,रस्ते बंद..

Date:

*पुणे महानगर पालिका हद्दीत बालेवाडी ब्रीज, मुळा नदी ब्रीज, संगम रोड ब्रीज, होळकर ब्रीज, संगमवाडी ब्रीज, महर्षी शिंदे ब्रीज, हडपसर- मुंढवा रोड ब्रीज, मातंग ब्रीज, येरवडा शांतीनगर येथील ब्रीज, निंबजनगर ब्रीज, मोई, व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत.

*पुणे महानगर पालिका हद्दीत एकता नगरी सिंहगड रोड वरील द्वारका सोसायटी, शरदा सरोवर सोसायटी, शाम सुंदर सोसायटी, निंबजनगर परिसरातील सोसायटी, सिंहगड रोड, घरकुल सोसायटी पिंपरी चिंचवड, वृंदावन आश्रम आकुर्डी
विशालनगर, जगताप डेअरी विणस सोसायटी, कुंदननगर या गृह निर्माण हाउसिंग सोसायटी मध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

*भिडे पूला शेजारील पूलाचीवाडी येथील ३ युवकांना शॉक लागून मयत झाले आहेत. त्यांची नावे अभिषेक घाणेकर, आकश माने व शिवा परिहार अशी आहेत.

ग्रामपंचायत असाणे येथील माळीण ते कुंभेवाडी हा रस्ता दरड कोसळ्यामुळे बंद झाला आहे त्या बाबत तहसीलदार आंबेगाव पाहणी करून jcb व इतर मशीन च्या साहाय्याने रस्ता मोकळा करण्यात येत आहे….

*लवासा रोड, ता.मुळशी येथे दरड कोसळली असून एन डी आर एफच्या टीमला बचाव कार्यासाठी कळविण्यात आलेले आहे.

*निंबजनगर परिसरातील सोसायटी व सिंहगड रोड वरील सोसायट्या मध्ये पाणी शिरल्याने घरात लोक अडकलेली आहेत त्यांना खाद्य पदार्थ आणि पाणी इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे.

*भिमाशंकर-खेड रोडवर दरड कोसळली असून खेड मधून भिमाशंकरकडे जाणार रस्ता बंद आहे.

*वडघर ता. वेल्हा येथे डोंगराची माती रस्त्यावर आली होती. ती माती बाजूला करून रस्ता वाहतूक सुरू केली आहे.

*मौजे-दासवे ता. मुळशी लवासा लेक सिटी येथील बंगल्यावर दरड कोसली आहे. सदर बंगल्यात ३ जण अडकले असल्याबबत प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. एनडीआरएफ टीम काम करत आहे.

*त्याच बरोबर पर्यटन स्थळ ठिकाणी २४ तासाकरिता बंदी आदेश जारी करण्यात आहे.

  • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पुणे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...