Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

या हिवाळ्यापासून न्यूयॉर्क जेएफके आणि नेवार्क उड्डाणांसाठी एअर इंडियाचे फ्लॅगशिप A350 तयार

Date:

·         A350 १ नोव्हेंबर २०२४ पासून दिल्ली-न्यूयॉर्क जेएफके फ्लाइटसह अति लांब पल्ल्याच्या उड्डाणासाठीची सुरुवात

·         A350 सह २ जानेवारी २०२५ पासून दिल्ली-नेवार्क फ्लाइट्स सेवा सुरू

·         A350 फ्लाइट्सवर प्रीमियम इकॉनॉमी केबिनची निवड उपलब्ध असणार

·         यूएसला जाणाऱ्या एअर इंडियाच्या सर्व फ्लाइट्सपैकी ६०% विमानांमध्ये अगदी नवीन किंवा अपग्रेड केलेले इंटिरियर सादर होईल.

गुरुग्राम/न्यूयॉर्क, २२ जुलै २०२४: एअर इंडियाने आज जाहीर केले की, त्यांच्या प्रमुख A350-900  विमानाची १ नोव्हेंबर २०२४ पासून दिल्ली-न्यूयॉर्क जेएफके उड्डाणे आणि २ जानेवारी २०२५ पासून दिल्ली-नेवार्क उड्डाणे होतील. त्यामुळे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या मार्गांवर प्रवाशांना प्रवासाचा उत्तम अनुभव घेता येईल.

प्रमुख मार्गांवर प्रीमियम इकॉनॉमी सादर करत आहे.

A350 तैनात केल्यामुळे दिल्ली-न्यूयॉर्क जेएफके आणि दिल्ली-नेवार्क मार्गांवर प्रथमच एअर इंडियाचा प्रीमियम इकॉनॉमी क्लासचा अनुभव मिळेल. यामुळे प्रवाशांना एका समर्पित, अपस्केल केबिनमध्ये 2-4-2 कॉन्फिगरेशनमध्ये असलेल्या 24 रुंद आसनांमधून निवड करता येईल. त्यामुळे त्यांना अतिरिक्त लेगरूम आणि इतर सुधारणांचा लाभ घेता येईल.

इतर केबिन आणि अत्याधुनिक सिग्नेचर अनुभव

एअर इंडियाच्या A350 विमानात 1-2-1 कॉन्फिगरेशनमध्ये फुल-फ्लॅट बेड्ससह बिझनेस क्लासमधील 28 खासगी सूट आणि 3-4-3 कॉन्फिगरेशनमध्ये 264 प्रशस्त इकॉनॉमी सीट्स आहेत. बिझनेसमधील प्रत्येक सूटसाठी थेट मार्ग, सरकते खासगी दरवाजे आणि वैयक्तिक वॉर्डरोब पुरविण्यात आला आहे.

A350 मधील केबिनमधील सर्व सीट्सवर अत्याधुनिक पॅनॅसॉनिक eX3 इन-फ्लाइट एंटरटेनमेंट (IFE) यंत्रणा आणि एचडी स्क्रीन असून, त्यामध्ये २,२०० तासांपेक्षा जास्त जगभरातील मनोरंजन प्रकार आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला A350 फ्लाइट्समध्ये एअरलाइनची नवीन सिग्नेचर सॉफ्ट उत्पादने आणि पुरस्कार विजेत्या अतिथी सुधारणा यांचे अनावरण करण्यात आले. यामध्ये नवीन चायनावेअर, नवीन टेबलवेअर आणि काचेची भांडी, नवीन बेडिंग व अनुक्रमे विशेषत: फेरागामो आणि TUMI यांनी डिझाइन केलेले बिझनेस, तसेच प्रीमियम इकॉनॉमी प्रवाशांसाठी अद्ययावत सुविधा किट यांचा समावेश आहे.

एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले, “दिल्ली-न्यूयॉर्क जेएफके आणि दिल्ली-नेवार्क या मार्गांवर आमचे विशेष खास उत्पादन सादर करण्यासाठी आमच्या A350s च्या देशांतर्गत तैनात करण्यात आलेल्या विमानांबद्दल प्रवाशांकडून आम्हाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळाले. आमच्या यूएस ऑपरेशन्ससाठी ही महत्त्वपूर्ण झेप असून, सतत सुधारणा करण्यासाठी असलेली आमची बांधिलकी यातून अधोरेखित होते.”

“नवीन आसनव्यवस्था असलेल्या सीट्स, नवीन इनफ्लाइट मनोरंजन प्रणाली आणि नवीन सॉफ्ट उत्पादने एकत्रितपणे आमच्या प्रवाशांना उत्तम आराम आणि सेवा पुरवतील. हे नवीन एअर इंडियाचे द्योतक आहे. आम्हाला विश्वास आहे की, ही विस्तारित सुधारणा एअर इंडियाचे अग्रगण्य विमान कंपनी म्हणून स्थान मजबूत करेल, तसेच भारत आणि युनायटेड स्टेट्सच्या दरम्यान जागतिक दर्जाच्या उड्डाणाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करेल.”

यूएसच्या इतर मार्गांवर अपग्रेड केलेले केबिन इंटिरियर

A350 दाखल करत अमेरिकेला जाणाऱ्या एअर इंडियाच्या सर्व ६०% विमानांमध्ये नवीन किंवा अपग्रेड केलेले केबिन इंटिरियर असेल.

गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांना लक्षणीयरीत्या सुधारित उड्डाणाचा अनुभव देण्यासाठी एअर इंडिया आपल्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून यूएसच्या इतर मार्गांवर आपल्या आधीच्या विमानांच्या जागी नवीन विमाने बदलत आहेत. या विमानांमध्ये अपग्रेडेड सीट्स आणि इनफ्लाइट एंटरटेनमेंट प्रणाली आहेत.

दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को आठवड्यातून तीन वेळा असलेली सेवा वगळता विमानकंपनी आता तिची तीन वर्ग-कॉन्फिगर केलेली बोईंग 777-200LR भारत (दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू) आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या दरम्यान सुधारित केबिन अंतर्भागांसह सर्व नॉनस्टॉप फ्लाइट्सवर कार्यरत राहणार आहे. यातील प्रत्येक विमानात बिझनेस मध्ये २८ पूर्ण-फ्लॅट बेडसह असलेले खासगी सूट आहेत.

प्रीमियम इकॉनॉमीमध्ये अतिरिक्त लेगरूमसह ४८ प्रशस्त सीट्स आणि इकॉनॉमीमध्ये २१२ सीट्स, तसेच अपडेटेड IFE प्रणाली आहे. यामुळे एअर इंडियाला सॅन फ्रान्सिस्कोला जाण्यासाठी/तिथून येण्यासाठी नॉनस्टॉप विमान निवडणाऱ्या प्रवाशांना सातत्याने प्रीमियम इकॉनॉमी पर्याय सादर करता येतो.

एअर इंडियातर्फे मुंबई ते न्यूयॉर्क जेएफके आणि नेवार्क या सर्व फ्लाइट्सवर तीन वर्ग-कॉन्फिगर केलेले बोईंग 777-300ER आहे. त्यामध्ये ८ आलिशान प्रथम श्रेणी सूट, बिझनेस क्लासमध्ये  ४० पूर्ण-फ्लॅट बेड, इकॉनॉमीमध्ये २८० सीट्स आणि अद्ययावत IFE प्रणाली आहे. 

न्यूयॉर्क जेएफके आणि नेवार्कसाठी एअर इंडिया A350 फ्लाइटचे बुकिंग

दिल्ली-न्यूयॉर्क जेएफके आणि दिल्ली-नेवार्क मार्गावरील A350 मधील सीट्स आता एअर इंडियाच्या वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर किंवा ट्रॅव्हल एजंटद्वारे आरक्षणासाठी उपलब्ध आहेत.

यू.एस. मार्गांवर A350 विमानांचे वेळापत्रक
फ्लाइट#विभागप्रस्थानआगमनउड्डाणाचे दिवसकधीपासून
AI101DEL-JFK0220 Hrs0735 Hrsदररोज१ नोव्हेंबर २०२४ पासून 
AI102JFK-DEL1230 Hrs1140 Hrs (+1)दररोज
AI105DEL-EWR0400 Hrs0910 Hrsआठवड्यातून ५ वेळा २ जानेवारी २०२५ पासून 
AI106EWR-DEL1115 Hrs1130 Hrs (+1)आठवड्यातून ५ वेळा 
B777s मार्फत कार्यरत अपग्रेड केलेल्या इंटिरियरसह असलेल्या विमानांचे वेळापत्रक
फ्लाइट क्र.उड्डाणाचे दिवसविभागप्रस्थानआगमन
Boeing 777-300ER मार्फत कार्यरत
AI119दररोजBOM-JFK0140 Hrs0740 Hrs
AI116दररोजJFK-BOM1155 Hrs1155 (+1) Hrs
AI191बुध, शुक्र, रवि. BOM-EWR0145 Hrs0755 Hrs
AI144बुध, शुक्र, रवि. EWR-BOM1205 Hrs1210 Hrs (+1)
Boeing 777-200LR मार्फत कार्यरत
AI173दररोजDEL-SFO0355 Hrs0700 Hrs
AI174दररोजSFO-DEL1030 Hrs1445 Hrs (+1)
AI179सोम, मंगळ, शुक्र, शनिBOM-SFO1350 Hrs1800 Hrs
AI180बुध, गुरू, शनि, रवि. SFO-BOM2030 Hrs0140 Hrs (+1)
AI175बुध, गुरू, रविBLR-SFO1350 Hrs1730 Hrs
AI176सोम, मंगळ, शुक्र.SFO-BLR2100 Hrs0325 Hrs (+1)

+1  म्हणजे दुसऱ्या दिवशी आगमन. DEL = दिल्ली, BOM = मुंबई, BLR = बंगळुरू, JFK = न्यूयॉर्क जेएफके, EWR = नेवार्क, SFO = सॅनफ्रान्सीस्को 

एअर इंडियाची A350 आणि व्यावसायिक सेवेसाठीच्या विमानांसाठीच्या ऑर्डर्स

एअर इंडियाने २०२४ च्या सुरुवातीपासून सहा A350-900 विमानांची डिलिव्हरी घेतली असून, नियामक अनुपालनासाठी, तसेच क्रूला व्यवस्थित माहिती व्हावी, या उद्देशाने भारतातील फ्लाइट्सवर आणि दिल्ली-दुबई मार्गावर विमानसेवेत तैनात केले आहे. १ सप्टेंबर २०२४ पासून, एअर इंडिया दिल्लीहून लंडन हिथ्रोसाठी त्यांचे A350-900 उड्डाण सुरू करेल. एअर इंडियाकडे २० A350-1000s सह एअरबसकडे ३४ इतर A350 साठीची ऑर्डर आहे.

एअर इंडियाची यूएसमधील कार्यसेवा

एअर इंडिया सध्या युनायटेड स्टेट्समध्ये न्यूयॉर्क जेएफके, नेवार्क, वॉशिंग्टन डीसी, शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्को या पाच ठिकाणी उड्डाण करते. भारतातून युनायटेड स्टेट्ससाठी एअर इंडियाची आठवड्याला ५१ विमान उड्डाणे होतात.

एअर इंडियाच्या A350 वरील केबिन वैशिष्ट्ये, विमानातील मनोरंजन सेवा आणि अधिक तपशील खालीलप्रमाणे आहेत:

·         आरामशीर बिझनेस: एअर इंडियाच्या A350-900 मध्ये बिझनेस क्लासमध्ये 1-2-1 कॉन्फिगरेशनमध्ये २८ खासगी सूट असून, प्रत्येकासाठी थेट मार्ग आणि सरकते खासगी  दरवाजे आहेत. प्रत्येक सीटमध्ये वैयक्तिक वॉर्डरोब आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सुविधा व शूजसाठी पुरेशी स्टॉवेज जागा आहे, तसेच प्रत्येक प्रवाशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सोईस्करपणे लावलेला आरसा आहे. 21-इंच एचडी टचस्क्रीन आणि व्हिडीओ हँडसेटमुळे आनंददायी मनोरंजन अनुभव मिळतो, तर युनिव्हर्सल A/C आणि USB-A पॉवर आउटलेट्स मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज राहतील, याची खात्री देतात.

·         अपस्केल प्रीमियम इकॉनॉमी: एअर इंडियाच्या A350-900 वरील प्रीमियम इकॉनॉमी केबिनमध्ये 38 इंच सीट पिच, 18.5 इंच सीट रुंदी व 8-इंच रिक्लाइनसह भरपूर लेगरूम उपलब्ध आहे. प्रत्येक सीटमध्ये 4-वे ॲडजस्टेबल हेडरेस्ट आणि आरामासाठी फूट पॅडलसह लेग रेस्ट व 13.3-इंच एचडी टचस्क्रीन आणि युनिव्हर्सल AC व USB-A पॉवर आउटलेट्स आहेत.

·         आरामदायी इकॉनॉमी क्लास : आरामदायी, तरीही स्टायलिश उड्डाण अनुभवासाठी इकॉनॉमीमध्ये 3-3-3 कॉन्फिगरेशनमध्ये 264 सीट्स आहेत, प्रत्येकी 31 इंच सीट पिच, 17.5 इंच सीट रुंदी आणि 6 इंच रिक्लाइन, 4-वे ॲडजस्टेबल हेडरेस्ट व 12-इंच एचडी टचस्क्रीन असून, ही चांगली मूल्यधिष्टीत सेवा दिली जाते.

·         इनफ्लाइट एंटरटेनमेंट (IFE): एअर इंडियाच्या नवीन IFE सीस्टिममध्ये २,२०० तासांहून अधिक गुंगवून टाकणारे मनोरंजन प्रकार फॉरमॅट आणि उत्तम शैलींमध्ये आहेत. त्यात ९८१  तासांचे चित्रपट, ५९५ तासांचे टीव्ही आणि ६२४ तास ऑडिओ प्रकार आहेत. प्रवासी आठ भाषांमधील २५० हून अधिक भारतीय चित्रपट आणि ७६ भारतीय प्रादेशिक चित्रपट, BAFTA व ऑस्कर-विजेत्या चित्रपटांसह २०० हून अधिक हॉलीवूड चित्रपट आणि १४ भाषांमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट यातून निवड करून मनोरंजनाचा आस्वाद घेऊ शकतात. खास प्रोग्राम केलेल्या एअर इंडिया रेडिओमध्ये प्रत्येक शैलीतील ८०० निवडींचा संगीत संग्रह आणि ६०  पेक्षा जास्त क्युरेट केलेल्या प्लेलिस्ट आहेत.

·         खास डिझाइन केलेले सुविधा किट: एअर इंडियाच्या बिझनेस क्लासच्या पाहुण्यांना खास फेरागामो सुविधा किट मिळतील. ही किट्स भारतातील विविध छपाई शैलीतील अनोख्या आकृतिबंधांसह सुयोग्य प्रेझेंटेशन बॅगमध्ये असणार आहेत. प्रीमियम इकॉनॉमी अतिथींना खास डिझाइन केलेले TUMI सुविधा किट मिळतील. ते एअर इंडिया रेड कलरच्या डिझाइनमध्ये समाविष्ट करण्यासाठी रिफ्रेश केले गेले आहेत आणि स्वीडिश लेबल, व्हरसोची स्किनकेअर यांसारख्या आवश्यक गोष्टींचा समावेश आहे.

·         आरामदायी, टिकाऊ आणि आलिशान बेड लिनन: बिझनेस क्लासच्या पाहुण्यांना टिकाऊ आणि हलके ड्युवेट्स आणि प्रीमियम व मेमरी फोम-लेयर्ड मॅट्रेस टॉपर्ससह खास डिझाइन केलेले लिनन दिले जातील. बिझनेसमधील ब्लँकेट्स प्रीमियम लोकरीच्या मिश्रणाने बनविलेल्या आहेत आणि खास एअर इंडियासाठी डिझाइन केल्या आहेत. त्याला नाजूक जॅकवर्ड बॉर्डर आणि भारताचा केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू व काश्मीरच्या पारंपरिक सोझनी एम्ब्रॉयडरीपासून प्रेरणा घेतलेली डिझाइन आहेत. प्रीमियम इकॉनॉमी आणि इकॉनॉमीमधील पाहुणे ट्वील विणलेल्या केबिन ब्लँकेटमध्ये आराम आणि उबदारपणाचा आनंद घेतील.

·         चायनावेअर, काचेची भांडी, कटलरी: वजनाने हलक्या आणि टिकाऊ साहित्याने बनलेल्या चायनावेअरच्या उत्कृष्ट संग्रहातून गुंतागुंतीचे मंडला पॅटर्न आणि समृद्ध जेवणाच्या अनुभवासाठी भारत-प्रेरित डिझाइन्स आहेत. वैशिष्ट्यपूर्ण असा भारताच्या वैशिष्ट्यांनी प्रेरित, टिफिन बॉक्सच्या आकाराचा, सोनेरी रंगातील सॉल्ट पेपर क्रूएट सेट जगभरातील पाहुण्यांना आनंद देण्यासाठी डिझाइन केलेला आहे. बिझनेस क्लासचे अतिथी स्लोव्हाकियामधील आलिशान, लीड-फ्री काचेच्या वस्तूंचा आनंद घेतील. हलक्या वजनासाठी पोकळ हँडल्स असलेली उत्कृष्ट स्टेनलेस स्टील कटलरी अतिथींचा जेवणाचा अनुभव आणखी उंचावतील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...