गुरू पौर्णिमा निमित्त श्री साई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Date:

पिंपरी, पुणे ( दि. २० जुलै २०२४) रविवारी साजऱ्या होणाऱ्या गुरू पौर्णिमा निमित्त आळंदी रोड, वडमुख वाडी येथील श्री साई मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री साईबाबा मंदिराचे अध्यक्ष व निमंत्रक सुभाष नेलगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
गुरू पौर्णिमा निमित्त शनिवारी पहाटेपासून सुरू झालेल्या महोत्सवाची सांगता सोमवारी होणार आहे. यामध्ये रविवारी (दि. २१) पहाटे पाच वाजता श्रीं ची काकड आरती, सनई वादन, मंगल स्नान, श्री साई चरित्र पारायण प्रारंभ, सकाळी ७ वाजता श्रींची आरती, ८ ते ९ रुद्राभिषेक, यानंतर दुपारी १२ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत माध्यान्ह आरती होणार आहे.
सायंकाळी पाच ते दहा भजन संध्या, ५:३० वाजता पालखी पूजा व मिरवणूक, सायंकाळी ७ वाजता धुपारती आणि रात्री ११ वाजता हरी जागर होईल. तसेच सोमवारी ( दि. २२) सकाळी सात वाजता आरती, ९ वाजता श्रींचे कीर्तन, ११ वाजता गोपाळ काला, १२ वाजता माध्यान्ह आरती, सायंकाळी सात वाजता दुपारती, ७:३० पालखी पूजा व मिरवणूक, रात्री दहा वाजता शेजारती होऊन कार्यक्रम सांगता होईल. ज्या साई भक्तांना पारायण सोहळ्यात आणि जलदिंडी मध्ये सहभाग घ्यायचा असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन विश्वस्त सुभाष नेलगे यांनी केले आहे.
……………………………….

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाला स्व.अजितदादा पवार यांचे नाव द्यावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात होणाऱ्या...

पुणे शहराने ३.१३ लाख कोटी रूपये एयूएम गाठला

पुणे: असोसिएशन ऑफ म्‍युच्‍युअल फंड्स इन इंडिया (एएमएफआय)ने आजमहाराष्‍ट्रातील...

‘थकबाकीमुक्त व अपघातशून्य महावितरण’ हीच प्राथमिकता – संचालक राजेंद्र पवार

महावितरणमधील पहिल्या 'वूडन बॅडमिंटन कोर्ट'चे पुण्यात थाटात उद्घाटन पुणे, १३...

लाचखोरीप्रकरणी मंत्र्याचे कार्यालय सिल केल्याची घटना अत्यंत गंभीर, सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर: हर्षवर्धन सपकाळ

निष्पक्ष चौकशीसाठी मंत्री नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा. मुंबई, दि....