मुंबई,: म्युच्युअल फंड उद्योगातील आघाडीच्या टाटा ऍसेट मॅनेजमेंट कंपनीने देशातील पहिला टुरिजम इंडेक्स फंड लॉन्च केला आहे. यामध्ये निफ्टी ५०० चा भाग असलेल्या काही कंपन्या सामील आहेत. टाटा निफ्टी इंडिया टुरिजम इंडेक्स फंड निफ्टी इंडिया टुरिजम इंडेक्सला (टीआरआय म्हणजे टोटल रिटर्न इंडेक्स) ट्रॅक करेल.
हा एक ओपन एंडेड इंडेक्स फंड आहे. गुंतवणूकदारांना प्रवास, पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसायांमध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या भारतातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या संधी देण्यासाठी हा फंड अतिशय काळजीपूर्वक डिझाईन करण्यात आला आहे. इंडेक्समधील कंपन्या आपापल्या क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. वाढते डिस्पोजेबल उत्पन्न, भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडींमध्ये होत असलेले बदल आणि डिस्क्रिशनरी खर्चांमध्ये होत असलेली वाढ यामुळे त्यांना अनेक लाभ मिळत आहेत.
इंडेक्स फंडच्या लॉन्च प्रसंगी, टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे मुख्य व्यवसाय अधिकारी श्री आनंद वरदराजन यांनी सांगितले, “वाढते डिस्पोजेबल उत्पन्न, पायाभूत सोयीसुविधांचा विकास जसे की, उत्तम हायवे कनेक्टिव्हिटी, अधिक चांगल्या व वेगवान रेल्वे सुविधा व नवीन विमानतळांनी प्रवास करणे अधिक सोपे, वेगवान आणि सुरक्षित केले आहे. देशांतर्गत विमान प्रवास सुविधा, हॉटेल्स, रेस्टोरंट आणि प्रवासामध्ये वेगाने वाढ होत आहे, पर्यटन क्षेत्रासाठी हा अतिशय चांगला संकेत आहे. सर्व प्रकारच्या प्रवासांमध्ये वाढ होत आहे, मग तीर्थयात्रा असो, व्यवसायासाठी, वैद्यकीय कारणांसाठी असो किंवा सुट्टीसाठी असो. त्यामुळे पर्यटन हे एक क्षेत्र म्हणून विकसित झाले आहे आणि या क्षेत्राच्या विकासाचे लाभ मिळवण्यासाठी यामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.”
टाटा निफ्टी इंडिया टुरिजम इंडेक्स फंडची सुरुवात अशा वेळी झाली आहे जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था मजबूत गुंतवणूक व उपभोगामुळे उल्लेखनीय लवचिकता दर्शवत आहे. भारतामध्ये मध्यमवर्गामध्ये वाढ होत असल्याने इच्छा-आकांक्षा म्हणून, अनुभव मिळावेत म्हणून केल्या जाणाऱ्या प्रवासांत वाढ होत आहे, पायाभूत सोयीसुविधांमध्ये गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळत आहे, हवाईमार्ग क्षमतांचा विस्तार होत आहे, त्यामुळे प्रवास करणे अधिक सहजसुलभ बनले आहे.
त्याखेरीज तंत्रज्ञानामध्ये प्रगतीमुळे ऑनलाईन रेस्टोरंट ऍग्रीगेटर्स आणि वाढत्या डिलिव्हरी अर्थव्यवस्थेबरोबरीनेच प्रवास व रेस्टोरंट क्षेत्रात क्रांती घडून आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वेगवेगळी ठिकाणे व अनुभवांची ओळख करून देत आहेत, त्यामुळे प्रवास करण्याच्या इच्छेला प्रोत्साहन मिळत आहे. श्री. वरदराजन यांनी सांगितले, “परिणामी, भारताचा प्रवास आणि पर्यटनावरील खर्च २०१९ मध्ये १४० बिलियन डॉलर्सवरून २०३० पर्यंत ४०६ बिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याचे अनुमान आहे. (स्रोत: युरोमॉनिटर, सिस्टमॅट्रिक्स इन्स्टिट्यूशनल रिसर्च)”
इंडेक्स पद्धत:
टाटा निफ्टी इंडिया टुरिजम इंडेक्स फंडमध्ये सध्या १७ स्टॉक आहेत. (२१ जून २०२४ पर्यंत) त्याच्या इंडेक्स पद्धतीमध्ये पर्यटनाशी संबंधित सर्व सेगमेंट्सचे जास्तीत जास्त प्रतिनिधित्व व्हावे यासाठी काटेकोर मापदंडांचे पालन केले जाते. इंडेक्समध्ये कमाल स्टॉक स्तराची सीमा २०% आहे. या इंडेक्समध्ये मूळ इंडेक्स निफ्टी ५०० मधून जास्तीत जास्त ३० स्टॉक असू शकतात. वैविध्य आणि जोखीम व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करत, इंडेक्स घटकांना फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायजेशनच्या आधारे भारित केले जाते.

