पुणे-प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे सतीश मिसाळ प्रतिष्ठानच्या वतीने 21 हजार किलो साबुदाणा खिचडीचे भाविकांना वाटप करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली. उपक्रमाचे हे 18 वे वर्ष आहे.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपक्रमाला भेट दिली. माधुरी मिसाळ, दीपक मिसाळ, करण मिसाळ, मनोज देशपांडे, अजय डहाळे, दिलीप मिसाळ यांनी संयोजन केले.
सतीश मिसाळ प्रतिष्ठानच्या वतीने 21 हजार किलो खिचडीचे वाटप
Date:

