पुणे (प्रतिनिधी): वारी ही माणसाची जगण्याची पद्धत असली तर खऱ्या अर्थाने कुठल्याही भेदविरहित समाज निर्माण घडेल. समता, बंधुता व एकतेवर आधारित समाज तयार करण्यासाठी वारकरी परंपरा समजून घेणे महत्त्वाच आहे असं मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड अभय छाजेड यांनी मांडले. निमित्त होतं ज्ञानभारती प्रतिष्ठान, लोकायत, पुणे शहर माळी संघ, वीर शैव लिंगायत प्रतिष्ठान आयोजित आषाढी वारी निमित्त दिंडी समतेची कार्यक्रमाचे. ही दिंडी विठू माऊलीचा जयघोष करत रविवार 14 जुलै सायंकाळी पाच वाजता जंगली महाराज मंदिर ते संभाजी गार्डन पर्यंत काढण्यात आली. सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून दिंडीची सुरूवात झाली. खेळ मांडला वाळवंटी घाई, विष्णू या जग वैष्णवांचा धर्म असे विविध अभंग दिंडीत गायले. तसेच दिंडीची भूमिका सांगणारी पत्रक उपस्थिततांना देण्यात आली. दिंडीचा समारोप लोकायत संघटनेची सांस्कृतिक आघाडी काफिलाने ‘तुका म्हणे’ ह्या अभंगांच्या सादरीकरणाने केला.
भक्ती संप्रदायातील संतांचे विचार ज्याचे प्रतिबिंब संविधानातही दिसतात, ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे याचं उद्देशाने या दिंडीच आयोजन करण्यात आले, असं लोकायतच्या समन्वयक अलका जोशी यांनी सांगितले.
या दिंडीला तरुणाईचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी पुणे शहर माळी महासंघाचे दीपक जगताप, वीर शिव लिंगायत प्रतिष्ठानचे नरेंद्र व्यवहारे, स्नेहसदन संस्थेचे फादर दिब्रिटो यांनी मनोगत व्यक्त केली.
वारी ही माणसाची जगण्याची पद्धत असली पाहिजे : ॲड अभय छाजेड
Date:

