Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना:काय आहेत अटी आणि शर्ती

Date:


मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 60 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे.
निर्धारित तीर्थस्थळापैकी एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा यात्रेकरूंना अधिकार असेल.
प्रवास खर्चाची प्रतिव्यक्ती मर्यादा 30 हजार कमाल आहे. यामध्ये भोजन निवास इत्यादी बाबींचा समावेश आहे.
लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसले पाहिजे.
या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार नसावे, अन्यथा लाभ मिळणार नाही.
ट्रॅक्टर वगळून इतर चारचाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही

महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे
राज्यातील 66 तीर्थक्षेत्राचा समावेश
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत राज्यातील एकूण 66 तीर्थक्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये सिद्धविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, चैत्यभूमी, माऊंट मेरी चर्च, मुंबादेवी, वाळकेश्वर मंदिर, गोराई येथील विश्व विपश्यना पॅगोडा, शिर्डीचे साई मंदिर, पंढरपूरसह राज्यातील अनेक मोठ्या स्थळांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांची यादी….!

  1. सिद्धिविनायक मंदिर मुंबई | 2. महालक्ष्मी मंदिर मुंबई | ३. चेत्यभूमी दादर मुंबई | ४. माउंट मेरी चर्च (वांद्रे) मुंबई | ५. मुंबादेवी मंदिर मुंबई | ६. वाळकेश्वर मंदिर मलबार हिल मुबई | ७. विश्व विपड्यना पॅगोडा गोराई मुंबई | ८. चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ, कॅवेल मुंबई | ९. सेंट अंडरयू चर्च मुंबई | १०. सेट जान द बँप्टिस्ट चर्च , सीप्झ औद्योगिक क्षेत्र, अंधेरी, मुंबई | ११. सेंट जॉन द बप्टिस्ट चर्चे, मरोळ मुंबई १२. | गोदीजी पार्श्वत मंदिर मुंबई १३. | नेसेट एलियाहू मुंबई १४. | शार हरहमीम सिनेगॉग , मस्जिद भंडार मुंबई १५. | मॅगेन डेव्हिड सिनेगॉग , भायखळा मुंबई १६. | सेंट जॉन द बँप्टिस्ट चर्च ठाणे १७. | अग्यारी / अग्निमंदिर ठाणे १८. | मयुरेश्वर मंदिर , मोरगाव पुणे १९. | चितामणी मंदिर , थेऊर पुणे २०. | गिरिजात्मज मंदिर , लेण्याद्री पुणे २१. | महागणपती मंदिर , रांजणगाव पुणे २२. | खंडोबा मंदिर , जेजुरी पुणे २३. | संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर , आळंदी पुणे २४. | भीमाशंकर ज्योतिलिंग मंदिर, खेड तालुका पुणे | २५. संत तुकाराम महाराज समाधी मंदिर, देहू पुणे | २६. संत चोखामेळा समाधी , पंढरपूर सोलापूर २७. | संत सावतामाळी समाधी मंदिर अरण ता. माढा सोलापूर २८. | विठोबा मंदिर , पंढरपूर सोलापूर २९. | शिखर शिगणापूर सातारा ३०. | महालक्ष्मी मंदिर , कोल्हापूर कोल्हापूर ३१. | जोतिबा मंदिर कोल्हापूर ३२. | जैन मंदिर, कुंभोज कोल्हापूर 33. | रेणुका देवी मंदिर , माहूर नांदेड |
  2. ३४. गुरु गोविद सिंग समाधी, हजूर साहिब , नांदेड नांदेड ३५. | खंडोबा मंदिर, मालेगाव नांदेड ३६. | श्री संत नामदेव महाराज देवस्थान, उब्रज ता. कंधार नांदेड ३७. | तुळजा भवानी मंदिर , तुळजापूर धाराशिव ३८. | संत एकनाथ समाधी, पैठण छत्रपती संभाजीनगर ३९. | घृष्णेश्वर ज्योतिलिंग मंदिर , वेरूळ छत्रपती संभाजीनगर ४o. | जैन स्मारके , एलोरा लेणी छत्रपती संभाजीनगर ४१. | विघ्नेश्वर मंदिर, ओझर नाशिक ४२. | संत निवृत्तीनाथ समाधी, त्र्यंबकेश्वर जवळ नाशिक ४३. | त्र्यंबकेश्वर शिव मंदिर , त्र्यंबकेश्वर नाशिक ४४. | Faery नाशिक ४५. | सप्तशंगी मंदिर , वणी नाशिक ४६. | काळाराम मंदिर नाशिक ४७. | जैन मंदिरे, मांगी-तुंगी नाशिक ४८. | गजपंथ नाशिक ४९. | संत साईबाबा मंदिर, शिर्डी अहमदनगर ५०. | सिद्धिविनायक मंदिर , सिद्धटेक अहमदनगर ५१. | शनी मंदिर , शनी शिंगणापूर , अहमदनगर ५२. | श्रीक्षेत्र भगवानगड , पाथर्डी अहमदनगर ५३. | बल्लाळेश्वर मंदिर , पाली रायगड ५४. | संत गजानन महाराज मंदिर , शेगाव बुलढाणा ५५. | एकवीरा देवी , काली पुणे ५६. | श्री दत्त मंदिर, औदुंबर सांगली ५७. | केदारेश्वर मंदिर बीड ५८. | वैजनाथ मंदिर, परळी बीड ५९. | पावस रत्नागिरी ६०. | गणपतीपुळे रत्नागिरी ६१. | मार्लेश्वर मंदिर रत्नागिरी ६२. | महाकाली देवी चंद्रपूर ६३. | श्री. काळेश्वरी उर्फ काळुबाई मंदिर सातारा ६४. | अष्टदशभुज (रामटेक) नागपूर ६५. | दीक्षाभूमी नागपूर ६६. | चिंतामणी (कळंब) यवतमाळ.

शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने आता राज्यातील जनतेला देवदर्शन घडविले जाणार आहे. पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार करणार आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर परराज्यातील तीर्थस्थळांना देखील लोकांना जाता येणार आहे. या योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती, त्या योनजेचा शासन आदेश रविवारी दि. 14 रोजी काढण्यात आला आहे.

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’साठी अपात्र कोण—ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, असे सदस्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाहीत. दरम्यान, 2.50 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी मात्र या योजनेसाठी पात्र ठरतील.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं (ट्रॅक्टर वगळून) त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
प्रवासासाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगानं ग्रस्त नसावं, जसं की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोना, थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी.
अर्जासोबत, ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यानं पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. (हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुनं नसावं)
जे अर्जदार मागील वर्षांमध्ये लॉटरीत निवडले गेले होते, परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवलं जाणार नाही.
जर असं आढळून आलं की, अर्जदार/प्रवाशानं खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्यं लपवून अर्ज केला आहे, ज्यामुळे तो/ती प्रवासासाठी अपात्र ठरतं, तर त्याला/तिला कधीही योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवता येईल.
सदर योजनेच्या ‘पात्रता’ आणि ‘अपात्रता’ निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेनं कार्यवाही करण्यात येईल.

कोणती कागदपत्र आवश्यक?
योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
लाभार्थ्याचे आधार कार्ड/रेशनकार्ड
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. (लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतंही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.)सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असणं अनिवार्य) किंवा पिवळे/केशरी रेशनकार्ड
वैद्यकीय प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक
सदर योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र.
योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा?
योजनेचा अर्ज पोर्टल/मोबाईल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरला जाऊ शकतो.
पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल.
अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
अर्जदारानं स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी अर्जदाराकडे खालील माहिती आणणं आवश्यक आहे…
कुटुंबाचं ओळखपत्र (रेशनकार्ड)
स्वतःचं आधार कार्ड

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

२०२६ साठी २४ दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; ‘भाऊबीजे’ला अतिरिक्त सुट्टी

मुंबई, दि. ९: महाराष्ट्र शासनाने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व...

लोकमान्यनगरच्या पुनर्विकासासाठी — ११ डिसेंबरला ‘घंटानाद आंदोलन’

 नागपुरातील अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्यनगरचा आवाज बुलंद करण्याची तयारी —...

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवाचे...