पुणे-आम आदमी पार्टी चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे कि,’महाराष्ट्रामध्ये विधानपरिषदेच्या निवडणुका काल झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडीचे मते फुटल्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसला.
महाराष्ट्राने खोके आणि बोकेचे राजकारण गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये पाहिले. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी विचार प्रणालीशी बांधिलकी मानत काम करेल अशी अपेक्षा असताना त्यांचे आमदार फुटतात ही बाब मतदारांचा अवमान करणारी आहे. महाराष्ट्रातील जनता याच फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळली असल्यामुळे लोकसभेमध्ये भाजपला त्याचा फटका बसला होता. आता महाविकास आघाडी बाबतही जनतेचा भ्रमनिरास होतो आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी आरोप करुन यातील फितूर आमदारांना पाच कोटी व मोठा विकास निधी मिळाल्याचा आरोप केला आहे. या नवीन खोके व्यवहाराची चौकशी व्हायला हवी आणि सत्य जनतेसमोर यायला हवं.
विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान च्या खोके व्यवहाराची चौकशी करा-मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी
Date:

