पुणे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आंबेडकर गटात राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. दांडेकर पूल येथील मांगीरबाबा चौकात हा कार्यक्रम पार पडला. शिखर वाहतूक संघटनेचे अध्यक्ष डॉ. एन.जी. पांडुळे यांच्या नेतृत्वाखाली २२० हुन अधिक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. राज्य महिला उपाध्यक्ष प्रियदर्शनीताई निकाळजे यांच्याहस्ते महिलांचा पक्षप्रवेश तसेच जिल्हाध्यक्ष सचिन खरात, शहरप्रमुख अशोक जगताप यांच्या हस्ते मांगीरबाबा चौकातील शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ऍड. राजाभाऊ सोनावणे, रवी क्षीरसागर, ईश्वर ढोले, रविराज चव्हाण, गौतम सुरडकर राजाभाऊ धिमधिमे, अनिल गायकवाड, गौतम सुरडकर उपस्थित होते. अण्णासाहेब बंडगर, असिफ पटेल, अजय मखरे, लीलाताई कांबळे यांच्यासह अनेकांनी पक्षप्रवेश केला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आंबेडकर गटात असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश
Date:

