चतु:श्रंगी, डेक्कन व विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल

Date:

पुणे, दि. १२ : वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील चतु:श्रंगी, डेक्कन व विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

चतु:श्रंगी वाहतूक विभागांतर्गत औंध येथील सिझन्स रोडवरील पंजाब नॅशनल बँक ते शाश्वत हॉस्पिटल रामबाण सहकारी गृहरचना सर्व्हे नंबर २५३/२ औंध सोसायटीच्या कमानी दरम्यान तसेच औंध येथील मेडीपॉईंट हॉस्पिटल चौक साई हॅरीटेज ते ज्ञानेश्वर मुरकुटे कमानीजवळील शिव शक्ती फ्लोअर मिल पर्यंत एकूण ६०० मीटर रस्त्यावर दोन्ही बाजुस पी १ पी २ पार्किंग झोन करण्यात येत आहे.

डेक्कन वाहतूक विभागांतर्गत भांडारकर रस्त्यालगत गल्ली नंबर ७ चे पूर्वेस असणाऱ्या रिक्षा स्टॅन्ड करिता जागा सोडून ते द-सोल बंगलाचे गेट पर्यत २० फुट दुचाकीसाठी पार्किंग करण्यात येत आहे. तसेच द-सोल बंगलाचे गेट पासून ते दानी बंगल्याचे मुख्य गेट (४० फुट ) दुचाकी पार्किंग व सिद्धसिला हाऊस कॉर्नरला लाईट खांब नंबर ६६/०७ ते सिद्धसिला गेट २५ फुट समोर दानी बंगल्यापर्यंत दुचाकी करिता पी १ व पी २ पार्किंग करण्यात येत आहे.

विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत अनंत कान्हेरे पथावरील मयूर स्वीट मार्ट ते सेनादत्त पोलीस चौकी दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस (१.३ कि.मी.) नो हॉल्टींग व नो पार्किंग झोन करण्यात येत आहे.

पार्किंग व्यवस्था बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात २५ जुलैपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.
0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याच्या महापौरपदी भाजपकडून मंजूषा नागपुरे,काँग्रेस कडून अश्विनी लांडगे

पुणे:पुण्याच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे यांची निवड भाजपाने केल्याने त्यांचा...

अमेरिकेने भारतावरील टॅरिफ 50% वरून 18% पर्यंत कमी केला;रशियाकडून तेल खरेदी करणार नाही,व्हेनेझुएलाकडून घेईल-भारताकडून ग्वाही

भारत आणि अमेरिकेदरम्यान ज्या व्यापार कराराची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती,...

भोसरी व पिंपरी विभागातील वीज पुरवठ्यावर परिणाम

महावितरणकडून वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन पुणे, दि. २ फेब्रुवारी,२०२६ : महापारेषण...