Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

विजय वडवेराव यांचा ‘भिडेवाडाकार’ उपाधीने सन्मान

Date:

पुणे : ‘मी बोलताच त्याने हंबरडा फोडला… भिडेवाडा बोलला, भिडेवाडा बोलला…’ या आणि अशा काव्यरचना, मुक्तच्छंद, ओवी, पाळणा, गीत, गझल, पोवाडा, सुंबरान, अभंग (अखंड) यातून भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यमहोत्सव रंगला. देशभरातून आलेल्या दोनशेहून अधिक कवींनी सुमारे दहा तास आपल्या काव्यसुमनांची उधळण केली. तीन वर्षांच्या चिमुकलीपासून ते ऐंशी वर्षांच्या आजींपर्यंतचे कवी व कवयित्री यामध्ये सहभागी झाले.
कवी विजय वडवेराव आयोजित भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यमहोत्सव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात नुकताच झाला. गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळसह राज्यातील दोनशेहून अधिक कवींनी सहभाग घेतला. वैविध्यपूर्ण काव्यप्रकार प्रभावीपणे सादर केले. सहभागी कवींना मानाची शाल, प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यात सुरु केलेल्या देशातील मुलींच्या पहिल्या शाळेबाबत जनजागृती करणारा प्रबोधनपर काव्यमहोत्सव पहिल्यांदाच झाला असल्याचे विजय वडवेराव यांनी नमूद केले.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे श्रीमती सुगलाबाई, सौभाग्यवती रीना आणि कुमारी स्वरा वडवेराव या एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांमधील स्त्रीशक्तीचे प्रतिनिधित्व करणार्‍या महिलांच्या हस्ते पूजन करून महोत्सवाचा प्रारंभ झाला. सावित्रीबाई फुले यांचे नायगाव येथील वंशज दिलीप नेवसे, तसेच शेकडो कवींच्या साक्षीने विजय वडवेराव यांना ‘भिडेवाडाकार’ ही उपाधी बहाल करण्यात आली. सन्मानचिन्ह, मानपत्र, फुले पगडी आणि उपरणे देऊन त्यांना गौरविण्यात आले.
विजय वडवेराव म्हणाले, “पहिल्यांदा २०१२ मध्ये भिडेवाड्यात गेलो. तेथील दुरावस्था पाहून ‘भिडेवाडा बोलला’ या दीर्घकवीतेचे एकटाकी लेखन हातून घडले. त्यानंतर त्याच वास्तुमध्ये कविसंमेलन आयोजित केले. संपूर्ण देशाला स्त्रीमुक्ती आणि स्त्रीशिक्षणाची प्रेरणा देणार्‍या भिडेवाड्याच्या भग्नावस्थेविषयी समाजजागृतीसाठी कवितेच्या माध्यमातून वेळोवेळी विविध उपक्रम राबवून चळवळ उभी केली. त्यामुळे आजवर देश-विदेशात ‘भिडेवाडा’ यावर हजारो कविता लिहिल्या गेल्या. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख, वस्ताद लहुजी साळवे, मुक्ता साळवे यांच्या योगदानाचा कवींनी अभ्यास केला.”
कविता काळे, डॉ. तेजस्विनी कदम, मीनाक्षी जगताप, प्रतिमा काळे, ॲड. उमाकांत अदमाने आणि सविता इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. विजय वडवेराव यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोर्टाच्या आवारातच महिलेवर कारमध्ये सामूहिक अत्याचार

ठाणे- आर्थिक विषमता , सामाजिक विषमता या बरोबर ...

पुतीन भेट समारंभास काँग्रेसच्या विरोधीपक्ष नेत्यांना राष्ट्रपती भवनचे निमंत्रण न देणे, ही परंपरा व संकेतांची पायमल्ली..!

प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी रशिया सोबत संबंधाची पायाभरणी...

पंतप्रधानांकडून अर्पोरा, गोवा येथे लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त

पीएमएनआरएफमधून अनुदान जाहीर मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पोरा, गोवा येथे ...