हाथरसमध्ये आठवडाभरापूर्वी सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत १२३ लोकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोनसदस्यीय एसआयटीने ८५५ पानांचा चौकशी अहवाल मंगळवारी राज्य सरकारला सोपवला. यामध्ये नारायण साकार हरी ऊर्फ ‘भोलेबाबा’ (सूरजपाल जाटव) यास क्लीन चिट देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी आणि तहसीलदारांसह ६ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
आग्राचे सहायक पोलिस महासंचालक आणि अलिगडचे पोलिस आयुक्त असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) १३२ लोकांचे जबाब, प्रकाशित झालेल्या बातम्या, व्हिडिओ फुटेज आणि छायाचित्रांना चौकशी अहवालाचा आधार बनवले आहे. या अहवालात म्हटले आहे की, घटनेच्या मागे एखादा मोठा कट असल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे सखोल चौकशीची गरज आहे.
अहवालानुसार, आयोजक मंडळाचे संबंधित लोक गैरव्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार आढळले आहेत. ज्या लोकांना कोणत्याही त्यांनी पोलिस व्हेरिफिकेशनविना जोडले त्यांच्याकडूनच गैरव्यवस्थापन झाले. आयोजक मंडळाने पोलिसांसोबतही गैरवर्तन केले. स्थानिक पोलिसांना कार्यक्रमस्थळी निरीक्षण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. सत्संगकर्ते व गर्दीला कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेविना एकमेकांना भेटण्याची सूट दिली. मोठी गर्दी असतानाही येथे कोणतीच बॅरिकेडिंग केली नव्हती. चेंगराचेंगरीनंतर आयोजक मंडळाचे सदस्य घटनास्थळावरून पळाले. अडीच लाख लोकांना बोलावत अपुरी व्यवस्था करणारे आयोजक पहिल्या व स्थळाचे निरीक्षण न करता आयोजनास मंजुरी देणारे अधिकारी दुसऱ्या क्रमांकावर निष्काळजीपणासाठी जबाबदार.
एसआयटीच्या अहवालानुसार, इलेक्ट्रॉनिक्स सर्व्हिलन्सच्या माध्यमातून दक्षिण भारतातील काही राज्यांचे चार मोबाइल क्रमांक ट्रेस करण्यात आले आहेत. मोबाइल टॉवर लोकेशनमध्ये हे क्रमांक घटनेच्या काही वेळेपूर्वी आणि नंतर सक्रिय होते. एसआयटीने हे क्रमांक संशयित आणि घटनेशी संबंधित आहेत का, हे पाहता व्यापक चौकशी करण्याची शिफारस केली आहे. तथापि, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९१ वर भरपूर ट्रकची वाहतूक होते. दक्षिण भारतातील ट्रक त्या भागातून त्याच वेळी गेले असावेत किंवा ट्रॅफिक जाममध्ये अडकले असावेत आणि ट्रकचालकांनी मोबाइलचा वापर केला असावा, या बाबी शक्य आहे. चौकशीअंती याचे सत्य समोर येईलच.
चेंगराचेंगरी १२३ मृत्यू पण अखेर भोलेबाबाला क्लीन चीट अन जिल्हाधिकारी,मुख्याधिकारी,तहसीलदारांसह 6 अधिकारी निलंबित
Date:

