पुणे, दि. ०९ जुलै २०२४: पुणे प्रादेशिक विभागात श्री. अमित कुलकर्णी (चाचणी) आणि पुणे परिमंडलमध्ये श्री. सिंहाजीराव गायकवाड (गणेशखिंड मंडल) व श्री. अनिल घोगरे (पायाभूत आराखडा) यांनी अधीक्षक अभियंता म्हणून नुकताच कार्यभार स्वीकारला आहे.

प्रादेशिक विभागाच्या चाचणी विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. अमित कुलकर्णी यापूर्वी पुणे ग्रामीण मंडलमध्ये कार्यकारी अभियंता (प्रशासन) होते. नुकत्याच झालेल्या अधीक्षक अभियंता पदाच्या थेट भरती प्रक्रियेत त्यांची निवड झाली. तसेच पुणे परिमंडल अंतर्गत गणेशखिंड मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सिंहाजीराव गायकवाड यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे. याआधी ते भांडूप परिमंडलातील नेरूळ विभागाचे कार्यकारी अभियंता होते. तसेच पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंतापदी श्री. अनिल घोगरे यांची बदली झाली. यापूर्वी ते कोकण प्रादेशिक विभागात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते.


