प्रशांत जगताप यांना विधानसभा उमेदवारीचे खा.सुप्रिया सुळेंकडून संकेत…
पुणे- बारामती आणि शिरूर लोकसभेतून निवडून आलेल्या शरद पवारांच्या दोन्ही चेल्यांनी अर्थात खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी हडपसर आणि खडकवासला, वडगाव शेरी मतदारसंघात लक्ष घालायला सुरुवात केली असून गद्दारी करणारांना धडा शिकविण्यासाठी विधानसभेच्या रणांगणात व्यूह नीती आखायला प्रारंभ केला आहे. कार्यकर्तेच नव्हे तर पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि थेट जनतेत जाऊन विधानसभेची चाचपणी करण्याची त्यांची नीती ही विधानसभेची चाचपणी मानली जाऊ लागली आहे.पुणे जिल्ह्यात विधानसभेला जेवढे उमेदवार पवार गट उभे करेल तेवढे निवडून आणायचेच हा पण करत ही रणनीती बांधली जाते आहे आणि त्याचे मुख्य शरद पवार असले तरी खरे शिलेदार सुप्रिया सुळे, आणि अमोल कोल्हे हेच असल्याचे स्पष्ट दिसले आहे.सध्या हडपसर आणि वडगाव शेरी येथील दोन्ही आमदार अजितदादा गटात सामील झालेले आहेत . आणि या दोन्ही जागांवर विशेष लक्ष देऊन गोड बोलून फसविणारे, संधिसाधू असले तरी त्यांना चुचकारून घेण्याचे राजकारण सुरु असल्याचे सांगण्यात येते अशा सर्वांचा वचपा काढण्यासाठी महापालिका निवडणुकांच्या वेळी वेगळी रणनीती आखली जाईल असे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान दुसरीकडे केंद्र व राज्य सरकारचे विरोधात तसेच महागाई बेरोजगारी अनेक मुद्द्यांवर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुण्यावर मोठ्या प्रमाणात आंदोलने होतात या आंदोलनाची राज्यात चर्चा होते सर्वसामान्यांचे आवाज उठवण्याचे काम प्रशांत जगताप करतात लोकसभेला तुमची साथ राहिली विधानसभेलाही साथ द्या असे आवाहन आज प्रत्यक्ष हडपसर येथील कार्यक्रमात करत प्रशांत जगताप यांना हडपसर विधानसभा उमेदवारीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी संकेत दिले आहेत .

