पालघरचा विशाल वालवी ठरला “सिंहगड एपिक ट्रेल मॅरेथॅान”चा विजेता

Date:

पुणे – वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशन आयोजित सिंहगड एपिक ट्रेल या आंतरराष्ट्रीय मॅरेथॅान स्पर्धा पालघरच्या विशाल वालवी याने पुरुषागटात तर स्पृथा पुथरान यांनी महिला गटात जिंकली. यावर्षी जगभरातून ८ देश, भारतातील २४ राज्य व ४५ शहरातून ११ कि.मी., २१ कि. मी., ३० कि.मी., व ४२ कि.मी. अंतर धावण्यासाठी धावपट्टूंनी सहभाग घेतला होता. स्वराज्याचा दैदीप्यमान ऐतिहासिक वारसा असलेल्या सिंहगडावर ही स्पर्धा सिंहगडाच्या वेगवेगळ्या पाच वाटांवरून पूर्ण करायची असते. सलग ११ तास चालणाऱ्या या माउंटन ट्रेल मॅरेथॉनमध्ये डोंगर -दऱ्या, चिखल, कडे-कपाऱ्या, आणि सिंहगडाच्या विविध वाटांवरून चित्तथरारक अनूभव स्पर्धकांना मिळतो. पर्यावरण संरक्षण, पुरातन वास्तू आणि गडकोट संवर्धनाच्या संदेशाबरोबरच व्यायामाचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो. स्पर्धेची सुरवात आणि शेवट सिंहगडाच्या पायथ्याला सिंहगड रोपवेच्या ॲाफीसजवळ करण्यात आली.

स्पर्धेचे उद्घाटन फ्रांसच्या डेल्फींगेन या कंपनीचे उपाध्यक्ष डेमियन पेरसोनेनी, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने, पुणे वनविभागाचे उप वनसंरक्षक दिपक पवार, सिंहगड रोपवेचे डायरेक्टर उदय शिंदे, पर्यटन विभागाचे प्रमुख, पुणे ग्रामिण पोलिस, घेरा सिंहगड ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, ग्रामस्थ, व स्पर्थेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिग्विजय जेधे, फाऊंडेशनचे सदस्य मंदार मते, महेश मालुसरे, ॲड. राजेश सातपुते, मारूती गोळे, हर्षद राव, अमर धुमाळ आणि अनिल पवार यांनी केले होते.
वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशन दरवर्षी सिंहगड एपिक ट्रेल या आंतरराष्ट्रीय मॅरेथॅानचे आयोजन जूनच्या अखेरच्या शनिवारी करत असते. सिंहगड एपिक ट्रेल ही स्पर्धा इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशन बरोबर निगडित आहे. ही चित्तथरारक स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या सर्व शूरवीर मावळ्यांना समर्पित करण्यात आली, अशी माहिती संस्थचेचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली.

३५० स्वयंसेवक व मित्र परिवारांनी २ दिवस घेरा सिंहगडमध्ये ठिकठिकाणी अत्यंत खेळीमेळीच्या वातवरणात स्पर्धेचे नियोजन केले. दौंड, मुळशी, हवेली, वेल्हा, व पुणे शहरातून आलेल्या Team WGRF च्या मित्र परिवाराने ही स्पर्धा यशस्वी केली.

स्पर्धेचा निकाल

पुरूष गट ४२ किलोमीटर
प्रथम क्रमांक – ५.१४.१२ विशाल वालवी
द्वितीय क्रमांक – ५.१७.५६ स्टान्झिंग वांगचुक
तृतीय क्रमांक – ५.३३.०१ शाश्वत राव

महिला गट ४२ किलोमीटर
प्रथम क्रमांक – ९.४३.०२ स्पृथा पुथरान

पुरूष गट ३० किलोमीटर
प्रथम क्रमांक – ३.३८.०५ विशाल राजबहार
द्वितीय क्रमांक – ३.४०.०२ अलबन रोगन फ्रान्स
तृतीय क्रमांक – ३.५३.५८ मुकुल दहिया

महिला गट ३० किलोमीटर
प्रथम क्रमांक – ५.३०.४३ ज्युबी जार्ज
द्वितीय क्रमांक – ६.४०.३२ यंकी धुकपा
तृतीय क्रमांक – ६.४१.०५ हेलनलुईस वॅाटरहाऊस इंग्लंड

पुरूष गट २१ किलोमीटर
प्रथम क्रमांक – २.३६.११ यशकुमार राज
द्वितीय क्रमांक – २.४३.२६ सुरज यादव
तृतीय क्रमांक – ३.०५.०४ साहिल भोसले

महिला गट २१ किलोमीटर
प्रथम क्रमांक – ४.१२.५१ रिया प्रधान
द्वितीय क्रमांक – ४.२१ निधी टुली
तृतीय क्रमांक – ४.३३.४५ सीमा बलिगा

पुरूष गट ११ किलोमीटर
प्रथम क्रमांक – १.२३.१७ जस्टिन बेचेरास फ्रान्स
द्वितीय क्रमांक – १.२३.१८ तनय कचरे
तृतीय क्रमांक – १.२६.१३  महेश गुप्ता

महिला गट ११ किलोमीटर
प्रथम क्रमांक – २.०३.४६ राखी गुप्ता
द्वितीय क्रमांक – २.०४.५८ रचना रोकडे
तृतीय क्रमांक – २.०५.२३ सायली पिलाने

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...