राज्यात दररोज ४ शेतकरी आत्महत्या, भाजपाप्रणित शिंदे सरकार शेतकरी विरोधी.

Date:

ओबीसी विद्यार्थ्यांना ५ वर्षांपासून शिष्यवृत्ती नाही, मागावर्गीयांना देशोधडीला लावण्याचे महायुती सरकारचे पाप.

मुंबई, दि. ४ जुलै
राज्यात मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळ आहे, शेतकरी संकटात आहे असे असताना शेतकऱ्याला मदत मिळत नाही तर दुसरीकडे पिकविमा कंपन्या शेतकऱ्यांच्या जीवावर खिसे भरत आहेत. राज्यातील सरकार पीक विमा कंपन्यांबरोबर आहे, मोदींच्या मित्रोंबरोबर आहे. महसूल विभागाची वेबसाईट आजही बंद आहे, या बेवसाईटवर नोंद झाली नाही तर पीक विमा मिळत नाही. शेतकऱ्यांची लूट करणारे हे पीकविमा धोरण बदलून शेतकरी हिताचे धोरण बनवा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, शेतकरी दुष्काळाचा सामना करत असतानाही शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळत नाही. सरकार ऐकायला तयार नाही. महाराष्ट्रात रोज ४ शेतकरी आत्महत्या होत आहेत, अधिवेशन काळातही या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. शेतकरी जगला तर देश जगेल म्हणूनच संकटातील शेतकऱ्याला आधार देण्यासाठी सरसकट कर्ज माफी जाहीर करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. पण या सरकारला शेतकऱ्यांचे हित साधायचे नाही, भाजपाप्रणित शिंदे सरकार हे शेतकरी विरोधी आहे.

मागासवर्गीय मुलांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे, ओबीसी मुलांना ५ वर्षांपासून शिष्यवृत्ती दिली जात नाही. ओबीसी समाजाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे व शेतीपासून बरबाद करायचे हे काम भाजपा सरकार करत आहे. सरकारच्या अशा चुकीच्या धोरणाविरोधात आमचा लढा सुरु आहे. शेतकरी, ओबीसी, आदिवासी, एससी, एसटी समाजाच्या हितासाठी काँग्रेस पक्षाचा लढा आहे असेही पटोले म्हणाले.

क्रिकेट खेळाडूंसाठी गुजरातची बस कशाला ?
टी-२० वर्ल्डकप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी राज्य सरकारने गुजरातमधून बस आणली यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील महायुतीचे सरकार हे गुजरातधार्जिणे आहे, मोदीशाहला ते त्यांचा आका म्हणतात. बेस्टकडे चांगल्या दर्जाची ओपन बस असताना वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंच्या मिरवणुकीसाठी गुजरातमधून बस आणणे हा खेळाडूंचा अपमान आहे. दिल्लीच्या आदेशावरून गुजरातची बस मुंबईत आणली असावी. खेळाडूंचे कौतुक केले पाहिजे पण त्यासाठी गुजरात समोर झुकण्याची गरज नव्हती, असेही नाना पटोले म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गुडलक चौक परिसरातील ‘कलाकार कट्टा’ स्थलांतर निर्णयाचा पुनर्विचार व्हावा – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांनी...

पुण्यात टिपू सुलतान यांच्या विटंबनेची तक्रार- फडणवीस व भाजपा आणि PPS वर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे-पुण्यात टिपू सुलतान यांच्या विटंबनेविरोधात स्वाती विलास गायकवाड (रा....

महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंडी 

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त चक्केश्वराची पूजापुणे...

महापालिकेत प्रोटोकॉल ऑफिसर, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी सह विविध पदांची भरती!

पुणे- महापालिकेतील विविध संवर्गातील एकाकी पदांची सरळसेवा भरती केली...