मनोहर भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा..अरविंद शिंदे

Date:

पुणे-मनोहर भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी येथे केली आहे,तेम्हणाले,’मनोहर भिडे नाव असलेल्या विकृत माणसाने वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची पुजा करताना महिलांनी काय नेसावे किंवा काय नेसू नये याबद्दल मुक्ताफळे उधळली आहेत. देशाला मिळालेले स्वातंत्र्य दळभद्री आहे असे बोंबलणाऱ्या मनोहर भिडे च्या विरोधात त्याच्या प्रतिमेस काळे फासुन चप्पल मारो आंदोलन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज फडके हौद, कसबा पेठ, पुणे येथे करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘मनाहेर भिडे यांनी कर्तत्ववान महिलांचा सातत्याने अपमान केला आहे. वट सावित्रीच्या पुजेला नट्यांनी जाऊ नये आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनीदेखील जाऊ नये, असे वादग्रस्त विधान भिडे यांनी करून महिला वर्गाचा अपमान केला आहे. वारंवार भिडे महिलांचा अवमान करणारी वक्तव्‍ये करीत आहे आणि सरकार डोळेझाक पणाचे सोंग घेत आहे. भिडेचा बोलवता धनी कोण आहे हे शोधून काढले पाहिजे. त्याचबरोबर देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे दळभद्री आणि हांडग आहे असे बालून शहिदांचा अपमान केला आहे. या बद्दल जर मिंदे सरकारमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी मनोहर भिडे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.’’

यानंतर उपस्थित महिलांनी मनोहर भिडे यांच्या प्रतिमेस चप्पलने मारून निषेध व्‍यक्त केला.

यावेळी पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या सह माजी आमदार दिप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीता तिवारी, नगरसेविका लताराजगुरू, नगरसेवक अजित दरेकर, नगरसेवक दत्ता बहिरट, महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी महेबुब नदाफ, ज्येष्ठ नागरिक संघाचे द. स. पोळेकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, ब्लॉक अध्यक्ष अजित जाधव, रमेश सोनकांबळे, अक्षय माने, अर्चना शहा, उषाताई राजगुरू, सुंदरताई ओव्हाळ, छाया जाधव, सीमा सावंत, प्रियांका मधाले, अनुसया गायकवाड, वैशाली रेड्डी, प्राजक्ता गायकवाड, ॲड रेशमा शिकलगार, नलीनी दोरगे, तृप्ती शेंडगे, सुरेखा काची, सायली गाडे, देविदास लोणकर, संजय डोंगरे, फिरोज शेख, हर्षद हांडे, मुन्नाभाई खंडेलवाल, शिवराज भोकरे, सचिन बहिरट, बाबा सय्यद, अनिल पवार, राज घेलोत, नरेश नलावडे, बंडु शेडगे, गीता तारु, पुणे शहर सोशल मीडिया प्रमुख गुलामहुसेन खान व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू

आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर...

आमन तांबे :- आधुनिक तमाशा सृष्टीचा ‘बादशाह’

लोककला ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख आहे. या परंपरेला...

भारतीय नौदलाची पहिली कमांडर परिषद 2026 नवी दिल्लीत

नवी दिल्ली- भारतीय नौदलाच्या द्वैवार्षिक कमांडर परिषद 2026 ची पहिली...

नवीन जाहिरात धोरण वादाच्या भोवऱ्यात,केवळ मोठ्या ठेकेदारांचे हित

-स्थानिक व्यावसायिकांना जाणीवपूर्वक स्पर्धेतून बाहेर काढल्याचा आरोप पुणे-महापालिकेने शहराचे उत्पन्न...