UPच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी, 122 जणांचा मृत्यू:रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच

Date:

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये भोले बाबांच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी घटना घडली. यामध्ये 122 जणांचा मृत्यू झाला. 150 हून अधिक जखमी आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अपघातानंतरची परिस्थिती भयावह आहे. रुग्णालयाच्या बाहेर जमिनीवर मृतदेह विखुरलेले आहेत.काही माध्यम प्रतिनिधींनी सिकनारौ सीएचसी, हाथरसमध्ये मृतदेहांची मोजणी केली. येथे 95 मृतदेह विखुरलेले आहेत. याशिवाय एटा सीएमओ उमेश त्रिपाठी म्हणाले – आतापर्यंत हातरसमधून 27 मृतदेह एटामध्ये आणण्यात आले आहेत. यामध्ये 25 महिला आणि 2 पुरुष आहेत. सीएमओ म्हणाले- मृतदेह आणि जखमींना टेम्पोमध्ये आणण्यात आले. मृतदेहांचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर पोस्टमॉर्टम केले जाईल. सत्संगात 20 हजारांहून अधिक लोकांची गर्दी होती.

हाथरसपासून 47 किमी अंतरावर असलेल्या फुलराई गावात हा अपघात झाला. अपघातानंतर कसेबसे जखमी आणि मृतांना बस-टेम्पोमध्ये भरून रुग्णालयात नेण्यात आले. सीएम योगी यांनी मुख्य सचिव मनोज सिंह आणि डीजीपी प्रशांत कुमार यांना घटनास्थळी पाठवले. घटनेच्या कारणाचा तपास करण्यासाठी एडीजी आग्रा आणि अलिगढ आयुक्तांची एक टीम तयार करण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकतकराच्या भल्या मोठ्या रकमेने ‘तो’ हादरला ? अन पिस्तूल काढून म्हटलं बास आता खेळ खलास झाला..!

पुणे महापालिकेच्या भवनातला प्रकार पुणे- शासकीय,निमशासकीय संस्था हल्ली सामान्य...

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

मसाप निवडणूक'साहित्य संवर्धन आघाडी’ जाहीरनामा प्रसिद्ध पिंपरी, पुणे (दि. १३...

अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश

पुणे (दि. १३) : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत...