पर्यटकानो सावधान…आपल्यासह कुटुंबाचा जीव असा धोक्यात घालू नका :कळकळीची विनंती
एकाच कुटुंबातील सर्व-4लहान मुले
पर्यटनासाठी गेलेले एकाच कुटुंबातील पाच सदस्य भुशी डॅम मध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली .
पुणे-लोणावळा शहरा जवळील नामांकित भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहातून 5 पर्यटक भूशी धरणात वाहून गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पर्यटकांचा शोध शिवदुर्ग रेसक्यू आणि वन्यजीव रक्षक मावळ पथकाच्या मदतीने सुरु आहे. आत्तापर्यंत धरणाच्या पाण्यातून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आद्याप तीन जणांचा शोध सुरू आहे.रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.लोणावळा परिसरात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येत असल्याने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हर फ्लो झाले आहे. सकाळच्या सत्रात धरण परिसरात पर्यटनासाठी आलेले काही पर्यटक रेल्वेचे विश्रांती गृह असलेल्या भागात डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्यातून वाहणाऱ्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेत होते. दरम्यान सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सदरचा धबधब्यातील पाणी वाढत होते, पाण्याच्या या प्रवाहामुळे पाच पर्यटक पाण्याच्या वेगाने धरणात वाहून गेले आहेत. ही माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह त्यांची टीम तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक, मावळ वन्य जीव रक्षक टीम व स्थानिक युवक यांनी घटनास्थळी जात शोध मोहीम सुरू केली आहे. संबंधित बुडालेली मुले ही पुण्यातील वानवडी परिसरातील सय्यद नगर येथील असून ते पर्यटनासाठी लोणावळ्यात गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
उशिरा मिळालेली माहिती
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुशी धरण परिसरात आलेले पर्यटक धरणाच्या पात्रात बुडाले. बुडालेल्या व्यक्तींची नावे साहिस्ता लियाकत अन्सारी (वय 36 वर्ष), अमिमा आदिल अन्सारी (वय 13 वर्ष), उमेश आदिल अन्सारी (वय 8 वर्ष), अदनान सबाहत अन्सारी (वय 4 वर्ष) आणि मारिया अकील सय्यद (वय 9 वर्ष) अशी आहेत. यापैकी साहिस्ता, अमिमा आणि उमेश यांचा मृत्यू झाला असून त्याचे मृतदेह सापडले आहेत. तर, बुडालेल्या इतर दोघांचा शोध सुरु आहे.
पर्यटकानो सावधान…आपल्यासह कुटुंबाचा जीव असा धोक्यात घालू नका :कळकळीची विनंती