अन…रुपाली ठोंबरे पाटलांसह तिघींचा पाठलाग करणाऱ्यानी ठोकली धूम …O

Date:

अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी काही मद्यधुंद तरुणांनी पाठलाग केल्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी या संदर्भात फेसबुकवर पोस्ट करत महिलांना सक्षम राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच दारू पिऊन फिरणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. दोन मद्यधुंद तरुणांनी रुपाली आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असे रुपाली यांनी म्हंटले आहे.
आपली सुरक्षा आपल्यालाच करावी लागते. वेळ प्रसंगी काली , दुर्गा अवतार घ्यावाच लागतो. दोन तरुणांनी पाठलाग केल्यावर मी गाडीतून उतरून त्यांना जाब विचारला. आरडाओरडा सुरू केल्यावर मी काढ ती बंदूक असे म्हणाले त्यांनतर त्या तरुणांना माझी ओळख पातळी आणि त्यांनी तिथून पळ काढला असा धक्कादायक अनुभव रुपाली ठोंबरे यांनी सांगितला आहे.

रुपाली ठोंबरे पाटलांनी घडलेला प्रसंग सोशल मिडिया तून केला शेअर मोटार सायकल सह पाठलाग करणाऱ्यांचे फोटो हो प्रसारित केले सोशल मिडिया वर

अत्यंत भयान प्रसंग होता कालचाआज सायंकाळी 7 ते 7.30 वेळ भोर येथील पिसावरे या गावात आमचे बंधू आण्णा बांदल यांच्या घराची वास्तुशांतीसाठी निघाले. मनीषाताई कावेडिया ,पूनम गुंजाळ सोबत होत्या.भोर मधून नांद या गावाकडचा मधला रस्ता हा अत्यंत शांत आणि छोटे रस्ते आम्ही ज्या दिशेला जात होतो त्या विरुद्ध दिशेने टू व्हीलरवर दोन एसम गाडीला किक मारत होते.ते फुल पिलेले होते आम्ही आपलं पुढे निघालो महिला पाहून ते गाडीचा पाठलाग करत आमच्या मागे मागे जवळ जवळ दीड ते दोन किलोमीटर आले ,मागे येतात समजतात गाडी थांबू नको रस्त्यावर कोणी नाही असे मनिषाला सांगितले,हे दारुडे टू व्हीलरची लाईट बंद करून हे दोन बेवडे गाडीच्या मागे येऊन टू व्हीलर आडवी घातली महिला आहे हे दिसत असताना सुद्धा डायरेक्ट हा गाडी ड्रायव्हर सीट कडू अंगावर आला,तेव्हा तातडीने मी गाडीतून उतरून त्याला जाब विचारायला सुरुवात केली.दोघे पूर्ण नशेतच होते मग डायरेक्ट आरडाओरडा सुर केला आणि काढ ती बंदुंक असे म्हणाले तेव्हा कुठे बेवडा स्थिर झाला त्यानंतर त्याला माझी ओळख कळली मग रूपालीताई पाटील ठोंबरे आहेत म्हंटल्यावर त्याने तिथून पळ काढला हे घडल्यावर क्षणभर मनात विचार आला माझ्या जागेवर जर इतर कोणी महिला असत्या तर या दोन बेवड्यांनी काय केलं असतं याचा विचार न केलेला बरं. एखादा मोठा गुन्हा नक्कीच घडला असता हे असे दारू पिऊन जी विकृत लोक फिरतात नशेत गुन्हे करतात यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे यांच्यावर कठोर कारवाई करणे गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे.दारू पिऊन रस्त्यावर अशा पद्धतीने महिलांना, लोकांना त्रास होईल असे वागणे आणि यातूनच गुन्हे घडणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात त्यामुळे यांच्यावर आळा बसणे अत्यंत गरजेचे आहे यांना कायद्याची भीती बसणे सुद्धा गरजेची आहे🙏मी त्यानंतर गाडीतून कंट्रोलला फोन करून घडलेली घटना सांगितली त्याचा गाडीचा नंबर त्यांचा फोटो तोही पाठवला अशा घटना कुठल्याही सर्वसामान्य महिलेसोबत,लोकांसोबत घडू शकतो याच्यातून मोठा गुन्हा होऊ शकतो त्यासाठी कारवाई होणे गरजेचे आहे.बेवडे जाताना फोटो ,गाडी नंबर फोटो काढला असल्या बेवद्या लोकांना सोडायचे नाही चंगच बांधला.दारू पिऊन फिरणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे त्यातूनच गुन्हे घडण्यास हिंमत मिळते. माझ्या माता,भगिनी,मैत्रिणींनो सक्षम व्हा, प्रसंगातून युक्त्या वापरून आपले रक्षण करा आपली सुरक्षा,रक्षण आपल्यालाच करावे लागते.वेळ प्रसंगी काली ,दुर्गा अवतार घ्यावाच लागतो म्हणून काल आम्ही महिला बचावलो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान

पुणे,: "समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक...

हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक:तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

सोलापूर -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त...

इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का?:दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? आसिफ शेख यांचा सवाल

मालेगाव -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल:शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपची तक्रार

पुणे-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी...