पुणे- पंजाब सोबत पुणे हे ड्रगचे प्रमुख केंद्र बनले आहे. पुण्यातील एक पिढी नशेच्या आहारी जात आहे. राजाश्रय असल्याशिवाय किंवा पोलिसांची मदत असल्याशिवाय पुण्यासारखे मोठे शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रगचा व्यवहार होणे शक्य नाही. पोलिस किंवा सरकारकडून केवळ कारवायाचे नाटक केले जात आहे. हे ड्रग्ज गुजरातवरुन येत आहे, त्याबाबत कारवाई होणे अपेक्षित आहे असे खासदार संजय राऊत यांनी येथे म्हटले आहे.
खा.संजय राऊत यांनी मुख्यमंत्री यांच्यावर पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले ,अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या लाडक्या बेटयाविषयी बालावे. ते सध्या सरकार मध्ये हस्तक्षेप करत आहे. आम्ही आमच्या बेटयाचे काय करायचं ते पाहू, तुमचा लाडला बेटा वर्षा बंगल्यावर बसून ज्या पध्दतीने पोलिस प्रशासन आणि बिल्डर यांच्याशी मधुर संवाद साधून पुढील निवडणुकीसाठी बोलणी करत आहे. त्याविषयी बोलावे असा टोला लगावला आहे.
यावेळी राऊत म्हणाले, विधानसमा निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा असला पाहिजे. कोणतीही निवडणूक बिनचेहऱ्याची असू नये. राज्यातील निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्रितरित्या लढवू. आमच्यात कोणतेही मतभेद नाही. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यश मिळेल. केंद्रात आघाडी तर्फे राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे लोकसभा निवडणुकीपूर्वी ठरले असते तर आघाडीच्या आणखी 25 ते 30 जागा सहजरित्या वाढल्या असत्या. कोणत्याही निवडणुक या त्यामुळे बिनचेहऱ्याचे असू नये. आपण कोणासाठी मतदान करतो आहे, हे लोकांना समजले पाहिजे. मविआ एकत्रित बैठकीस बसल्यावर याबाबत निर्णय घेतला जाईल. विधानसभेत आघाडीला 175 ते 180 जागा मिळतील अशी अपेक्षा आहे.