पुणे-
सालाबादप्रमाणे यंदाचे वर्षी श्री.संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरात रविवार दि. ३०/६/२०२४ रोजी आगमन होणार आहे.श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन आळंदी रस्त्यावरील स्व. सयाजीराव कुसमाडे संकुल (करसंकलन कार्यालय), कळस क्षेत्रिय कार्यालय, आळंदी रस्ता येथे दुपारी १२.३० वाजता आगमन झाल्यानंतर प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले पालखींचे दर्शन घेऊन स्वागत करणार आहेत. तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखीचे मुंबई पुणे रस्त्यावरील बोपोडी सिग्नल चौक येथे दुपारी १.३० वाजता आगमन झाल्यानंतर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले पालखीचे दर्शन घेऊन स्वागत करणार आहेत. दुपारी ४.०० वाजता मुंबई पुणे रस्त्यावरील नाबार्ड बँकेसमोर पाटील इस्टेट वसाहतीशेजारी येथे दोन्हीही पालख्यांचे दर्शन घेऊन स्वागत करणार आहेत.
मंगळवार दि. २/७/२०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता हडपसर गाडीतळ जवळ, हडपसर येथून दोन्हीही पालख्यांचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थानावेळी डॉ. राजेंद्र भोसले पुणे मनपाचे वतीने निरोप देणार आहेत.
वरीलप्रमाणे प्रसंगी मा. प्रशासक तथा महापालिका आयुक्त यांचेसमवेत अतिरिक्त महापालिका आयुक्त, उप आयुक्त, खातेप्रमुख, मनपा वरिष्ठ अधिकारी, संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित रहाणार आहेत.
मनपाच्या विविध विभागांच्या वतीने करण्यात आलेल्या सुविधा-
आरोग्य विभाग- पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाèया वारकèयांच्या आरोग्याची काळजी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी फिरत्या दवाखान्यांद्वारे मोफत आरोग्यसेवा पुरविली जाणार आहे. दि. ३० जुन २०२४ रोजी पुणे मनपाचे वैद्यकीय पथक (जुना फिरता दवाखाना) वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, नर्स, नर्सिंग ऑर्डर्ली व प्रथमोपचारासह पुणे – मुंबई रस्त्यावरील फुले नगर (विश्रांतवाडी), पुणे – मुंबई रस्त्यावरील पाटील इस्ेटट वाकडेवाडी, साखळपीर तालीम येथे उपस्थित राहील व पालखी सोबत रफी महंमद किडभाई शाळा, भवानी पेठ पोलीस चौकी समोर, रामोशी गेटपर्यंत राहील. व दर्शनाला येणाèया वारकèयांसाठी/ भाविकांसाठी मोफत उपचार करण्यात येतील. पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत रफी महंमद किडभाई शाळा, भवानी पेठ व मामासाहेब बडदे दवाखाना, नानापेठ येथे प्राथमिक उपचारासाठी २४ तास दवाखाने कार्यरत ठेवण्यात येऊन वारकèयांना मोफत उपचार करण्यात येतील. पुणे जिल्ह्यातील शासकिय व खाजगी रुग्णालयातील १०% बेड्स (खाटा) आरक्षित ठेवणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच दवाखाने, प्रसुतिगृह/रुग्णालये येथे मोफत तपासणी व उपचार दिले जाणार आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पुणे मनपाचे वैद्यकीय पथक पुणे ते पंढरपुर मुक्कामापर्यंत पाठविणेत येणार आहे. सदर वैद्यकीय पथकामध्ये १ वैद्यकीय अधिकारी, २ फार्मासिस्ट, १ रायटर, २ नर्सिंग ऑर्डली व १ रुग्णवाहिका चालक यांचा समावेश असेल. या पथकामार्फत पुणे ते पंढरपुर पर्यंत वारकèयांना मोफत प्राथमिक औषधोपचार पुरविण्यात येतील. किटक नाशक विभागामार्फत पालखी मार्ग, सर्व दिंड्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात येणार आहे. तसेच पशु वैद्यकीय विभागामार्फत पुणे मनपा हद्दीतील भटक्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.
पथ विभाग- सोलापूर रोड व सासवड रोड येथील रेलिंग्जची साफसफाई करुन त्यांचे रंगकाम, झेब्रॉ क्रॉसिंग थर्मोप्लास्टिक पेंटींगची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत.
पालखी मार्गावरील राडारोडा उचलण्यात आलेला असून साफसफाई करण्यात आलेली आहे. पालखी मार्गावरील सिमेंट क्राँक्रिटचा भाग सोडून उर्वरीत ठिकाणांचे पॅचवर्कची कामे करण्यात आली आहेत. पालखी आगमनाच्या दृष्टीने करावयाच्या सर्व उपाय योजनांच्या अनुषंगाने पावसाचे पाणी साठणाèया ठिकाणी पादचारी व वारकèयांच्या सोयीसाठी तेथील पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आलेल्या असून त्याबाबत दक्षता घेण्यात आलेली आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभाग-पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत सर्व सार्वजनिक रस्त्याचे झाडणकाम, क्रॉनिक स्पॉटची स्वच्छता व जमा होणाèया कचèयाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात दिवसातून तीन वेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्यात येणार आहे. भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत स्वच्छता विषयक कामकाज करण्यासाठी अंदाजे एकूण ३५० पुरुष सफाई सेवक व २५० महिला सफाई सेविका असे एकूण ६०० सफाई सेवक कार्यरत आहेत. १५ क्षेत्रिय कार्यालयामध्ये एकूण अंदाजे १६९० पोर्टेबल व फिरते शौचालयाची सोय करण्यात आलेली असून दिवसातून तीन वेळा स्वच्छता करण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत महिला वारकèयांसाठी आवश्यतेनुसार मनपा शाळेत व खाजगी शाळेत मुक्कामाच्या ठिकाणी शौचालय व महिलांसाठी न्हाणी घराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच सार्वजनिक रस्त्यावर व वारकरी मुक्कामी असलेल्या ठिकाणी स्वच्छता राहण्याच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून २,६२५ लिटर जर्मीक्लीन, ३७,५०० किलो कार्बोलिक पावडर व ११,२५० किलो हर्बल वेस्टस्ट्रीट पावडर इत्यादी पुरविण्यात येणार आहे. महिला वारकèयांसाठी ५०,००० सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभाग, शिक्षण मंडळ, पाणीपुरवठा विभाग, मलनिस्सारण विभाग, गलिच्छ वस्ती निमूर्लन विभाग, विद्युत विभाग, वाहन विभाग,भवन रचना, ड्ेनेज, पथ विभाग, आरोग्य, अतिक्रमण, उद्यान, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांनी जय्यत तयारी केलेली आहे.
अग्निशमन विभाग –
१. पालख्यांच्या मुक्कामाच्या काळात अग्निशमन दलाकडे जादा सेवकवर्ग उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने अग्निशमन दलाकडील सर्व अधिकारी व सेवकांच्या सर्व प्रकारच्या रजा व साप्ताहिक सुट्ट्या बंद करण्यात आलेल्या आहेत.
२. पालख्यांसमवेत येणाèया वारकèयांच्या मुक्कामासाठी पुणे मनपाकडून उपलब्ध करुन देण्यात येणाèया शाळांची पालख्यांच्या आगमनापूर्वी अग्निशामक दलाकडून आग प्रतिबंधक दृष्टीने पाहणी करण्यात येऊन आवश्यक त्या उपाययोजना करणेबाबातच्या सूचना संबंधित शाळा प्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत.
३. पालख्यांच्या मार्गावरील झाडांच्या फांद्यांच्या अडथळा न होण्याचे दृष्टीने उद्यान विभागाकडून अशा फांद्या तोडण्यात येतात. या कामी अग्निशामक दलाकडून उद्यान विभागास आवश्यक ते सहकार्य करण्यात आले आहे.
४. फुलेनगर व वाकडेवाडी या ठिकाणी अग्निशमन दलाच्या वतीने अग्निशमन वाहने सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात ठेवण्यात येतात.
५. सदरील पालख्यांचा मुक्काम पालखी विठोबा मंदिर व निवडुंगा विठोबा मंदिर या ठिकाणी होत असल्याने सदरील दोन्ही मंदिरांची आग प्रतिबंधक दृष्टीने अग्निशमन दलाकडून पाहणी करण्यात येऊन संबंधितांना जरुर त्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
६. पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यानंतर या सर्व शाळा स्वच्छ करणेसाठी क्षेत्रिय कार्यालयांना अग्निशमन दलाकडून आवश्यकतेनुसार पंप उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
७. दरवर्षीप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी समवेत एक अग्निशमन वाहन सेवक वर्गासह आळंदी ते पंढरपूर पर्यंत पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दि. ३०/६/२०२४ ते २/७/२०२४ अखेर दररोज कचरा कंटेनर मधील कचरा दोन्ही पालख्या उतरलेल्या ठिकाणच्या व नाना पेठ व भवानी पेठ आजूबाजूच्या सर्व परिसरातील कचरा उचलण्याची दक्षता घेणेस व आवश्यक त्या ठिकाणी जंतुनाशक पावडरचा वापर करणेबाबत व कचरा कंटेनर हलविताना कोणासही इजा होणार नाही याची दक्षता घेणेबाबत नियोजन करण्यात आले आहे.
सालाबादप्रमाणे पालख्यांच्या आगमनानंतर मुक्कामी व प्रस्थानानंतर अशा तीनही टप्प्यात वेळोवेळी स्वच्छता राखावयाच्या दृष्टीने नियमित व पालख्यांच्या मागोमाग व प्रस्थानानंतर झाडणकामाचे नियोजन करण्यात आले आहे.
विद्युत विभाग- पुणे महानगरपालिकेमार्फत येणाèया तात्पुरत्या मंडपामध्ये प्रकाश व्यवस्था व ध्वनीक्षेपक यंत्रणा व्यवस्था करणेत येणार असून वारकèयांच्या निवासासाठी नियोजित मनपा शाळांमध्ये प्रकाश व्यवस्था करणेत येणार आहे. मंदिर परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविणेत येणार आहेत.
मंदिर परिसर व वारकरी निवास स्थानामध्ये पाण्याची व्यवस्था करणेत येणार असून मनपा पाणीपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच वारकèयांच्या सुविधेसाठी मदतकेंद्र, आगप्रतिबंधक सेवा केंद्र, हरवलेल्या व्यक्तिंसाठी शोध व मदत केंद्र, आरोग्य सुविधा केंद्र, विविध माहिती व जनजागृती केंद्र तसेच निवडुंग विठोबा मंदिर व पालखी विठोबा मंदिर परिसरामध्ये सुमारे १०० ठिकाणी तात्पुरती मंडप व्यवस्था करणेत आलेली आहे. भवानी पेठ व नाना पेठ येथील रस्त्यावरील ड्रेनेज लाईन सुरळीत राहतील याची दक्षता घेण्यात येणार आहे.
अतिक्रमण विभाग- पालखी मार्ग व मुक्काम परिसरातील रस्ता/पदपथावरील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढणेबाबत आदेश दिलेले आहेत. वारकèयांचे रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविणेकरिता अतिक्रमण निर्मुलन पथके/बहुउद्देशीय पथके व सर्व संबंधित अतिक्रमण निरीक्षक/ सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यांनी कारवायांचे नियोजन करुन कारवाया करण्यात येऊन भाविकांना व वारकèयांना रहदारीसाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन विभाग- आपत्ती व्यवस्थापना संदर्भातही नियोजन करण्यात आले असुन या संदर्भात पुणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्कात असल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख गणेश सोनुने यांनी कळविले आहे.
मनपा अधिकारी, कर्मचारी यांचा पालखी वारीत ‘‘कामगार िंदंडीचा सहभाग दरवर्षीप्रमाणे यंदाचे वर्षीही आळंदी ते पुणे या पालखी मार्गात पुणे महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी ‘‘कामगार दिंडी द्वारे सहभागी होणार आहेत.
आवाहन.
१. नागरिकांनी ,भक्तगणांनी ,वारकèयांनी पालखी मार्ग, पालखी निवास परिसर येथे व ज्या ज्या ठिकाणी मनपाचे वतीने पाणीपुरवठा करण्यात आलेला आहे अशा पाण्याचा वापर करावा.
२. सार्वजनिक ठिकाणी ,नाला परिसर अशा ठिकाणी अस्वच्छता करू नये.
३. परिसरातील सार्वजनिक शौचालये ,मोबाईल टॉयलेटस ,सुलभ शौचालये यांचा वापर करावा.
४. उघड्यावरील अन्नपदार्थ ,चिरलेली व अति पिकलेली फळे खाऊ नयेत.
५. मदतीची आवश्यकता असल्यास जाहीर करण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावर कृपया संपर्क साधावा.
६. केळींच्या, फळांच्या साली खाद्यपदार्थाचे कागद असा कचरा निश्चित केलेल्या कचरापेटीत टाकावा अथवा संबंधित कर्मचारी, संबंधित स्वयंसेवकांकडे द्यावा.
७. पालखी कालावधी कृपया प्लॅस्टिक बॅगा, कॅरीबॅगांचा वापर करण्यात येऊ नये.