आदिवासी विभाग गट ‘क’ च्या पद भरती प्रक्रियेस तुर्तास स्थगिती

Date:

पुणे, दि. २७ : आदिवासी विकास विभागामार्फत ६०२ विविध रिक्त पदे भरण्याकरिता २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापि महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६ नुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग या संवर्गाचा समावेश करून जाहिरात पुन:श्च प्रसिद्ध करण्याच्या सूचना असल्याने २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या गट ‘क’ च्या पद भरती प्रक्रियेस तुर्तास स्थगिती देण्यात येत आहे, असे आदिवासी विकास विभागाने कळविले आहे.

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग संवर्गाचा जाहिरातीत समावेश करुन तसेच पुन:श्च बिंदूनामावली अद्ययावत करुन गट-क संवर्गासाठी पुन:श्च जाहीरात प्रसिद्ध करण्याबाबत शासन स्तरावरुन सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुन:श्च बिंदूनामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे.

क्षेत्रीय कार्यालयाची बिंदूनामावली अद्ययावत झाल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही सविस्तर कळविण्यात येईल. तसेच ज्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज केले आहेत त्यांनी या बदलाबाबतची नोंद घ्यावी, असे नाशिकच्या आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी कळविले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकतकराच्या भल्या मोठ्या रकमेने ‘तो’ हादरला ? अन पिस्तूल काढून म्हटलं बास आता खेळ खलास झाला..!

पुणे महापालिकेच्या भवनातला प्रकार पुणे- शासकीय,निमशासकीय संस्था हल्ली सामान्य...

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

मसाप निवडणूक'साहित्य संवर्धन आघाडी’ जाहीरनामा प्रसिद्ध पिंपरी, पुणे (दि. १३...

अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश

पुणे (दि. १३) : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत...