डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्कार’ रीना पाटील यांना प्रदान

Date:

दिव्यांगांचा प्रेरणेचा प्रवास पुढे यावा : डॉ. श्रीकांत केळकर

पुणे :आडकर फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ‘डॉ. हेलन केअर स्मृती पुरस्कार’ दृष्टीहीनतेवर मात करून स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या रीना पाटील यांना ज्येष्ठ नेत्र तज्ञ तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ्थेल्मॉलॉजीचे संस्थापक डॉ. श्रीकांत केळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दिवंगत दृष्टिहीन सामाजिक कार्यकर्त्या डॉ. हेलन केलर यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे वितरण गुरुवारी (दि. २७) सकाळी अकरा वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झाले. नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंडचे राष्ट्रीय सल्लागार दिलीप शेलवंते , सौ. मैथिली आडकर , सौ. अरुणा केळकर उपस्थित होते. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. निरुपमा महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. श्रीकांत केळकर म्हणाले,’ प्रेरणादायी व्यक्तीचा प्रवास सर्वांपर्यंत आणण्याचे काम प्रेरणादायी आहे.आडकर फाऊंडेशनचे हे काम प्रोत्साहनात्मक आहे. संकटांना घाबरता पुढे जात राहिले पाहिजे. दृष्टीहीन व्यक्तींना समाजाने साथ देत राहिले पाहिजे. प्रेरणेचा प्रवास सातत्याने प्रगतीकडे जात राहिला पाहिजे.

मनोगत व्यक्त करताना रिना पाटील म्हणाल्या, ‘ दृष्टीहीन व्यक्तींनी सहानुभूती मिळवत बसू नये. डोळे नाहित तरी इतर अवयव कार्यरत आहेत , या जिद्दीने काम करावे. समाजाने देखील इतर व्यक्तींप्रमाणे दृष्टीहीन , दिव्यांग व्यक्तींना वागवले पाहिजे . मनातील दुःख बाजूला ठेऊन हसऱ्या चेहऱ्याने वावरले पाहिजे’.

दिलीप शिलवंते म्हणाले , ‘ हष्टीहीन व्यक्तींसाठी समाधानकारक असले तरी पुरेसे नाही, हे काम वाढले पाहिजे.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या विषयावर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, यात श्रीनिवास शारंगपाणी, वासंती वैद्य, राजश्री लेले, स्वप्निल पोरे, सौदामिनी साने आदींचा सहभाग होता. त्याचे सूत्र संचालन वैजयंती आपटे यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकतकराच्या भल्या मोठ्या रकमेने ‘तो’ हादरला अन पिस्तूल काढून म्हटलं बास आता खेळ खलास झाला ..

पुणे महापालिकेच्या भवनातला प्रकार पुणे- शासकीय , निमशासकीय संस्था...

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

मसाप निवडणूक'साहित्य संवर्धन आघाडी’ जाहीरनामा प्रसिद्ध पिंपरी, पुणे (दि. १३...

अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश

पुणे (दि. १३) : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत...