सामाजिक समतेचा पाया राजर्षी शाहू महाराजांनी रचला ही लोकशाही व समानतेची पाया भरणी होती..!
पुणे दि २६ -सामाजिक समतेचा पाया श्री राजर्षी शाहू महाराजांनी रचला ही लोकशाही, समाजवाद व समानतेची पाया भरणी होती..!देशात संविघानिक कर्तव्यपुर्तीने, जाती निहाय जनगणना करून सामाजिक समतेची व्याप्ती निश्चित करणे हीच् शाहु महाराजांना आदरांजली ठरेल.. असे प्रतिपादन “राजर्षि शाहू महाराज जयंती” निमित्त आयोजित, अभिवादन प्रसंगी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.
या प्रसंगी जन संघर्ष समिती, पुणे चे वतीने, १५० किलो बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजक “जन संघर्ष समिती” पुणे आयोजित डेक्कन जिमखाना गुडलक चौक (कलाकार कट्टा) फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
ते पुढे म्हणाले की, ‘राज्य वा केंद्र सरकारने’.. श्री छ शाहु महाराजांची १५० वी जयंती ‘विशेषरुपी साजरी करणे’ गरजेचे होते, मात्र ती न केल्याने, सरकार शाहु महाराजांच्या समानतेच्या विचारांशी फारकत ठेऊन असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या वेळी कर्नल संग्रामसिंह यादव व प्रा. गंगाधर बनबरे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज प्रतिमेचे पूजन करून जयंती उत्सवाला सुरुवात झाली. माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील, ऊल्हास पवार, अशोक धिवरे, मोहन जोशी, संदिप बर्वे, रविंद्र रणसिंग, ॲड संदिप ताम्हणकर, एम डी निंबाळकर इत्यादि नी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले.
यावेळी जन संघर्ष समितीचे चे अध्यक्ष ॲड रवींद्र रणसिंग, संतोष पवार, किशोर सरदेसाई, ॲड संदीप ताम्हणकर, योगेश माळी, काँग्रेस चे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, माजी न्या. बी जी कोळसे पाटील, माजी पोलीस महासंचालक अशोक धिवरे, डेक्कन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे मॅडम, एन डी निंबाळकर, भगवानराव डीकलेपाटील, विलास सुरशे, पत्रकार मुकुंद काकडे, नाथा राणे, दत्तात्रय जाधव, सुभाष वारे, प्रा. विकास देशपांडे, शशी धीवार, संदीप बर्वे, नितीन पवार, अनंत सूर्यवंशी, अमोल सावंत सुखदेव सूर्यवंशी, श्रिकुमार काळे, संजय शिरोळे, महेश येवले, विलास पाटील, प्रकाश भारद्वाज, सुनीता नेराळे, अभिजित राजे भोसले, ॲड मोहन वाडेकर, ॲड फय्याज शेख, राजाभावू भनगे, व पुणेकर नागरिक उपस्थित होते. तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणी व शाळा विद्यालय चे विद्यार्थी हे उत्स्फूरतपणे सहभागी झाले. जयंती कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्र शासना तर्फे शाहू महाराज गौरव ग्रंथ पुनर्प्रकाशित करण्यात यावा व छत्रपती शाहू महाराज यांचा डेक्कन परिसर पुणे येथे पुतळा उभारावा अशी मागणी करण्यात आली.
‘राज्य वा केंद्र सरकारने’ शाहु महाराजांची १५० वी जयंती ‘विशेषरुपी साजरी न करणे’ हे शाहु महाराजांच्या समानतेच्या विचारांशी फारकत असल्याचे द्योतक-काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी
Date:

