रोहित सराफ पुन्हा एकदा नव्या चित्रपटात दिसणार मणिरत्नम दिग्दर्शित ‘ठग लाइफ’ मध्ये काम करण्यास रोहित सज्ज
नवीन कास्ट अलर्ट! रोहित सराफ मणिरत्नम दिग्दर्शित ‘ठग लाइफ’ मध्ये दिसणार !
रोहित सराफ कमल हासन स्टारर ‘ठग लाइफ’ या मणिरत्नम दिग्दर्शित चित्रपटाचा होणार भाग रोहित सराफ सातत्याने प्रभावी भूमिका करून प्रेक्षकांची मन जिंकत आहे आणि नुकत्याच आलेल्या एका बातमी वरून तो मणिरत्नमचा ‘ठग लाइफ’ या चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग होणार असल्याचं कळतंय. ही नवीन आणि आव्हानात्मक भूमिका तो कशी साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
तुम्ही जे वाचलं ते बरोबर आहे ! रोहित मनीरत्नमच्या पुढील चित्रपटात काम करणार आहे ज्यामध्ये तो दिग्गज कमल हासनसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. रोहितच्या भूमिकेबद्दलचे तपशील अजून समोर आले नसून या या बातमीने त्याच्या चाहत्यांमध्ये आधीच खळबळ उडवून दिली आहे. रोहितने आधीच चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे आणि तो कथेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे “अस जवळच्या एका सूत्राने सांगितले आहे. स्त्रोत पुढे सांगतात मणिरत्नम ऑगस्ट 2024 पर्यंत चित्रपट संपवणार अशी अपेक्षा आहे आणि निर्माते डिसेंबर 2024 मध्ये रिलीज करणार आहेत. रोहित सध्या ‘इश्क विश्क रिबाउंड’ मधील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी मिळणाऱ्या प्रेमाचा आनंद घेत आहे. राघवच्या त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांशी वेगळं नात जोडल आहे. चित्रपट प्रदर्शित होताच सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला. रोहित ‘मिसमॅच्ड सीझन 3’ मध्ये ऋषी शेखावतच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. तो वरुण धवन, जान्हवी कपूर आणि सान्या मल्होत्रा यांच्यासोबत ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ नावाच्या धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटात काम करणार आहे.

