Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मजबूत एमएसएमई वित्तपुरवठा प्लॅटफॉर्म म्हणून उदयास येत आहे उद्योग प्लस

Date:

एमएसएमई साठी दोन मिनिटांत सुलभ वित्तपुरवठा सुविधा, नऊ महिन्यांत ८ लाखांहून अधिक नोंदणी आणि ५०० कोटी रु. चे वितरण

मुंबई२६ जून २०२४: आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड (“ABCL”) ची वित्तपुरवठा करणारी उपकंपनी आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड (“ABFL”) चा B2B प्लॅटफॉर्म उद्योग प्लस आपल्या विकासाच्या प्रवाहाचा लाभ घेत आहे. सादर झाल्यापासून नऊ महिन्यांत प्लॅटफॉर्मवर ८  लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी नोंदणी केली असून त्यावरून एमएसएमई क्षेत्रात प्लॅटफॉर्मला मिळत असलेली मजबूत स्वीकृती दिसून येत आहे. ABFL ने एमएसएमईसाठी दोन मिनिटांत वित्तपुरवठा सुलभ करण्यात मोठी भूमिका बजावली आहे.

उद्योग प्लसने ५०० कोटी रु.पेक्षा जास्त कर्ज वाटपाची सोय केली असून त्यामध्ये या रकमेपैकी दोन तृतीयांश वाटा आदित्य बिर्ला ग्रुप (ABG) इकोसिस्टमचा आहे. विविध प्रकारच्या कर्जाच्या गरजा पूर्ण करत प्लॅटफॉर्म तर्फे सुमारे २५० कोटी रु. च्या एयूएम (व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता) चे व्यवस्थापन केले जाते. यामध्ये असुरक्षित व्यवसाय कर्ज, व्यापारी कर्ज, पुरवठा साखळी वित्तपुरवठा आणि खेळते कार्यरत भांडवल सुविधा यांचा समावेश आहे. जोडीला, अनेक ग्राहक कर्जासह विमा सुविधा मिळविण्यासाठी उद्योग प्लस वापरतात.

एबीएफएल एबीजी इकोसिस्टममध्ये उद्योग प्लसचा विस्तार करत आहे आणि व्यापक पातळीवर एमएसएमई वर्गापर्यंत पोहोचत आहे. प्लॅटफॉर्मने ई-कॉमर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म, व्यवसाय व्यवस्थापन प्लॅटफॉर्म आणि OCEN आणि ONDC सारख्या डिजिटल पब्लिक पायाभूत सुविधा यांच्यासह भागीदारी केली आहे. हे सहयोग प्लॅटफॉर्मच्या योजना आणि पोहोच वाढवत आहेत.

उद्योग प्लस बिझनेस नेटवर्किंग, डिजिटल कॉमर्स आणि अकाउंटिंग आणि पेरोलसाठी अॅप्लिकेशन्स अशा मूल्यवर्धित सेवा देखील पुरविते. त्यामुळे एमएसएमईंना त्यांचे कार्य सुव्यवस्थित करण्यात मदत होते. आपल्या मोबाइल ॲपसह प्लॅटफॉर्म एक अखंड वित्तपुरवठा अनुभव सुनिश्चित करून, अंडररायटिंग ते कलेक्शनपर्यंतचा संपूर्ण डिजिटल प्रवास सादर करतो.

उद्योग प्लस प्लॅटफॉर्म विस्तारत असताना ABFL शाश्वत परतावा देण्यासाठी आणि एमएसएमईंना सेवा देण्याची क्षमता वाढवण्यासाठी बांधील आहे. ही वाढ सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांसाठीच्या वाढत्या कर्ज वितरणाच्या प्रवाहाशी सुसंगत आहे.

अलीकडे, असे दिसून आले आहे की, मागील वर्षाच्या तुलनेत एप्रिल २०२४ मध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योगांना १८.६% ने वाढून १९.६४ लाख कोटी रु.चा वित्तपुरवठा करण्यात आल्यामुळे भारतातील एमएसएमईं क्षेत्र क्रेडिट बूम अनुभवत आहे. त्याचप्रमाणे, मध्यम आकाराच्या संस्थांना मिळालेल्या कर्जामध्येही याच कालावधीत १६.५% ने वाढ झाली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देश विविध समस्यांनी त्रस्त त्याकडे दुर्लक्ष करून बंगालच्या निवडणुका म्हणून वंदेमातरम वर मोदींची चर्चा

सोमवारी लोकसभेत वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या...

काँग्रेसने वंदे मातरम् चे तुकडे केले:जिन्नासमोर नेहरू झुकले..मोदींचा पुनरघोष

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी सोमवारी लोकसभेत वंदे मातरम्‌ला १५०...

अखेर 21 डिसेंबरची MPSC परीक्षा लांबणीवर:आता 4 जानेवारीला होणार पेपर

मुंबई-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमुळे 21...

मुंढवा प्रकरणातील आरोपी तहसीलदाराने 85.50 लाखांची थकबाकी भरली रोख…

पुणे -मुंढवा भूखंड घोटाळ्यातील आरोपी असलेल्या निलंबित...