![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2024/06/3.jpeg)
आशा पारेख, वहिदा रहमान आणि हेलन या ज्येष्ठ अभिनेत्री सध्या श्रीनगरमध्ये सुटी घालवत आहेत. अभिनेत्री आशा पारेखने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत.70च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्रींचे व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2024/06/448774976_895921255883393_7543974531183156295_n-1024x943.jpg)
चाहते त्यांच्यावर आजही खूप प्रेम करत आहेत.या तिन्ही अभिनेत्रींचे काश्मीरशी जुने संबंध आहेत. तिघींनीही आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण येथे कधी ना कधी केले आहे. वहिदा रहमान यांच्या ‘कभी कभी’ चित्रपटाचे शूटिंगही श्रीनगरमध्ये झाले होते. हेलन यांच्या ‘जंगली’ आणि ‘दस लाख’ या चित्रपटांचे शूटिंगही काश्मीरमध्ये झाले होते.आशा पारेख यांनी 1959 मध्ये ‘दिल देके देखो’ आणि 1963 मध्ये ‘फिर वही दिल लाया हूं’ या सुपरहिट चित्रपटांचे शूटिंग काश्मीरमध्ये केले होते.एका छायाचित्रात तिन्ही अभिनेत्री हाऊसबोटमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत, तर दुसऱ्या छायाचित्रात तिघीही श्रीनगरमधील डल लेकसमोर असलेल्या ‘द ललिता ग्रँड पॅलेस’ हॉटेलच्या लॉनमध्ये नाश्ता करताना दिसत आहेत.हे फोटो शेअर करत आशा पारेख यांनी लिहिले, ‘माझ्या प्रिय मित्रांसोबत श्रीनगरमधील हाउसबोटचा आनंद घेत आहे.’ यासोबतच आशा यांनी फ्रेंड्स फॉरएव्हर आणि फन टाईम सारखे हॅशटॅगदेखील वापरले.
![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2024/06/KASHMIR-.jpg)