गणेशोत्सवात घड्याळाचे काटे दाखवणारे गुन्हे दाखल करणारे पोलीस पब्ज बाबत करतात काय ?
पुणे-येथील पब संस्कृती तातडीने हद्दपार करा. यामुळे पुण्याची प्रतिमा मलिन होते आहे. पब संस्कृतीतील अवैध कामांशी सामान्य पुणेकरांचा काहीही संबंध नाही. पण त्यामुळे पुणेकर बदनाम होत आहेत. पोलिसांनी यामध्ये तातडीने गंभीर पावले उचलली पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून हे सगळं बंद करू, असा इशारा सोमवारी दिला.पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील एका पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर याच पब बाहेर सोमवारी पुणे शहर भाजपाने निदर्शने केली. राज्यातील महायुती सरकारने वेळोवेळी आदेश आणि सूचना देऊनही पुण्यातील पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून पबवर आवश्यक कारवाई होत नाही. या पबमध्ये सुरू असलेल्या अवैध कामांवर कारवाई होत नाही. त्यामुळे नाहक पुण्याची प्रतिमा मलिन होते आहे.
वास्तविक पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. सांस्कृतिक राजधानी आहे. अनेक मान्यवर मंडळी या शहरात वास्तव्याला आहेत. पण गेल्या काही महिन्यात उघडकीस आलेल्या घटनांमुळे पुण्याची प्रतिमा मलिन झाली आहे. यामध्ये पोलिसांनी आणि प्रशासनाने जबाबदारी घेतली पाहिजे.
पब संस्कृतीला सामान्य पुणेकर वैतागले आहेत. काही रहिवाशांनी पबमुळे आपले राहते घर सोडले आणि ते दुसरीकडे शिफ्ट झाले. ही वेळ त्या सामान्य पुणेकरांवर का आली, याचाही विचार पोलिसांनी केला पाहिजे.पुणे पोलिस गणेशोत्सवात घड्याळाचे काटे दाखवत सामान्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देतात. मग इतक्या राजेरोसपणे रात्री उशिरापर्यंत पुण्यात पब कसे काय सुरू असतात, असा प्रश्न पडतो. गेल्याच आठवड्यात आम्ही शाळांबाहेरील टपऱ्यावर कारवाई करा. तेथून विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थ विकले जातात. त्यामुळे त्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली होती. आता पुन्हा अमली पदार्थांचा व्हिडिओ समोर आला आहे. हा विषय अत्यंत गंभीर असून, पोलिसांनी पुण्यातून पब संस्कृतीच हद्दपार केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. जर पोलिसांनी सगळ्यांना दिसेल अशी कारवाई पब संस्कृतीविरोधात केली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही दिला.यावेळी भाजपाचे पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे निवेदन
- पुण्यात सुरू असलेले सर्व पब हद्दपार करण्याचा निर्णय राज्य शासनाने तातडीने घ्यावा
- जिल्हाधिकारी, पोलीस पोलीस आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त, पीएमआरडीए आणि उत्पादन शुल्क विभागाचे सुप्रिटेंडर यांनी तातडीने पब ची अधिकृत नियमावली आणि शहर आणि जिल्ह्यातील अधिकृत पब ची यादी प्रसार माध्यमांद्वारे नागरिकांसाठी प्रसिद्ध करावी
- अनधिकृतपणे व्यवसाय करत असलेल्या पब वर उद्यापासून भारतीय जनता पार्टी पुणे चे कार्यकर्ते आमच्या पद्धतीने ॲक्शन घेतील
- त्यासाठी भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांची रचना केली असून उद्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल हा सर्व अनधिकृत पब व्यवसायिकांना इशारा आहे
- ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गणेशोत्सवामध्ये रात्री दहा वाजता स्पीकर बंद केले जातात त्याच धर्तीवर रात्री 10 नंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व पबमधील स्पीकर बंद करावेत
- पब संदर्भात स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी
- महिलांच्या सुरक्षिततेसाठी रात्रीच्या वेळी महिला अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक
- रात्रीच्या वेळी वेगाने गाड्या चालवणारे अशे जाळे करणारे आणि आरडाओरडा करून परिसरात अशांतता निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी
- शहरातील ड्रगच्या ऍक्टिव्हिटीज थांबविण्यासाठी पोलिसांनी काय प्रयत्न केले याची माहिती द्यावी
- नागरिकांना अवैध धंद्यांची माहिती देता यावी यासाठी हेल्पलाइन सुरू करावी
- शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत आहे त्या संदर्भात आमच्याकडे माहिती आली असून लवकरच गुटखे विक्रेत्यांचा आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्यांचा पर्दाफाश केला जाईल
- पुणे हे आपल्या सर्वांचे शहर आहे. त्याच्या सुरक्षिततेची आणि पुढील पिढीची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे. या शहराला पब मुक्त करण्यासाठी आणि पुण्याचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी पुणेकरांनी सतर्क राहून सहकार्य करावे

