दिल्ली-आजपासून हरियाणातील रेवाडी, मेरठ, मुझफ्फरनगर आणि उत्तर प्रदेशातील शामली आणि राजस्थानच्या अजमेर, पाली आणि राजसमंदमध्येही सीएनजीच्या किमती वाढल्या आहेत. रेवाडीतील सीएनजीचे दर आता 78.70 रुपये प्रति किलोवरून 79.70 रुपये प्रति किलो झाले आहेत. तर उत्तर प्रदेशातील मेरठ, मुझफ्फरनगर आणि शामलीमध्ये किंमत 79.08 रुपयांवरून 80.08 रुपये प्रति किलो झाला आहे. राजस्थानच्या अजमेर, पाली आणि राजसमंदमध्ये सीएनजी 82.94 रुपये प्रति किलो दराने मिळेल.
दरम्यान, लखनौ, उन्नाव, आग्रा आणि अयोध्येत मागील रविवारपासून सीएनजीच्या किमती वाढल्या आहेत. लखनौ, आग्रा, उन्नावमध्ये सीएनजीची किंमत 92.25 आणि अयोध्येत 92.35 होती. त्यात आता वाढ होऊन लखनौ, उन्नाव, आग्रा आणि अयोध्यामध्ये सीएनजीची किंमत 94.00 रुपये प्रति किलो झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे.
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आजपासून म्हणजेच 22 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाली आहे. सीएनजीच्या दरात किलोमागे एक रुपयाची वाढ झाली आहे.
या वाढीनंतर आता राजधानी नवी दिल्लीत सीएनजी 74.09 रुपये प्रति किलोऐवजी 75.09 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होत आहे. या वाढीचा परिणाम दिल्ली-एनसीआरसह उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये सीएनजीच्या किरकोळ किमतींवर होणार आहे.
नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्येही सीएनजीच्या दरात एक रुपयाने वाढ झाली आहे. या शहरांमध्ये, सीएनजी आत्तापर्यंत 78.70 प्रति किलो दराने उपलब्ध होता, जो आता 79.70 प्रति किलो झाला आहे. मात्र गुरुग्राम, कर्नाल आणि कैथलमध्येही सीएनजीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

