पुणे-मुंबई :बंगळुरू महामार्गावर कात्रज परिसरात स्वामीनारायण मंदिराजवळ दरी पूलनजीक एका पडक्या उंच इमारतीवरून एक तरुणी व एक तरुण त्यांचा जीव धाेक्यात टाकून एक धाेकादायक व्हिडिअाे तयार करून त्याची रील बनवल्याचा प्रकार उघडकीस अाला हाेता. ती रील साेशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पाेलिसांनी तरुण-तरुणीविराेधात भारती विद्यापीठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला हाेता. चाैकशीअंती मिहिर नितीन गांधी ( २४, मूळ गाव गुजर गल्ली, मारुती मंदिराजवळ, धाराशिव) अाणि मीनाक्षी हनुमंत साळुंके (२१, मूळ गाव चाकण काळूस, ता.खेड, जि. पुणे) अशी दाेघांची नावे असून त्यांना नाेटीस देऊन यापुढे अशी स्टंटबाजी करू नये, अशा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली.
अॅथलिट असलेल्या तरुणीने यापूर्वीही धोकादायकरीत्या केले अनेक स्टंट
मीनाक्षीच्या इन्स्टाग्राम अायडीवर तिने अशाच प्रकारे वेगवेगळे स्टंट करून धाेकादायक व्हिडिअाे बनवल्याचे निष्पन्न झाले अाहे. तिच्यासाेबत व्हिडिअाे शूटिंग करणारे काेण काेण साथीदार अाहेत त्यांचा तपास करण्यात येत अाहे. याबाबत पाेलिस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या, मिहिर-मीनाक्षीचे व्हिडिअाे धाेकादायक असल्याने त्यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यात कलम ३०८ ची वाढ केली अाहे. मीनाक्षी अॅथलिट असून यापुढे रील बनवताना काळजी घेऊन समाजाचे भान ठेवून साेशल मीडियावर वावरताना व्हिडिअाे, फाेटाे टाकत जावे. सामाजिक जबाबदारी ठेवून वागावे, अशी सूचना तिला केली आहे.