कलर्स मराठीवर एकत्र आल्या ‘सावित्री’, केली वटपौर्णिमा साजरी

Date:

वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिलांनी वटवृक्षाची पूजा केल्यास नवऱ्याची आयु वाढते, असे मानले जाते.
कलर्स मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांना उत्तम गुणवत्ता असलेल्या मालिका भेट देत असून नेहमीच रसिकांचे मनोरंजन करत आली आहे. ही वाहिनी नेहमीच रसिकांसाठी काहीतरी हटके घेऊन येत असते. हीच परंपरा कलर्स मराठीने देखील जोपासली असून नुकताच कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर वटपौर्णिमाचा खास व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुकवर पाहू शकता.

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ‘इंद्रायणी’ या मालिकेमधून शकुंतला वडाच्या झाडाला कुंकू लावतेय, तर झाडामागून ‘अंतरपाट’ मालिकेतील गौतमी हातात धागा घेऊन क्षितिजसोबत सुरु होणाऱ्या नव्या संसाराचे सुख मागत आहे. दुसरीकडे ‘अबीर गुलाल’ मालिकेतील श्रीची आई वडाच्या झाडामागून येताना दिसत असून ‘रमा -राघव’ मालिकेतून रमा कुटुंब जोडताना मिळणारी राघवची अतूट साथ सात जन्म राहू देत असे म्हणत आहे. ‘पिरतीचा वनवा उरी पेटला ‘ या मालिकेतून सावी अर्जुनची साथ मागत आहे. तर, सुख कळले या मालिकेतून मिथिला तिच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करत आहे.

कलर्स मराठीच्या प्रत्येक मालिकेत सध्या वटपौर्णिमेचा खास ट्रॅक सुरु आहे. ‘इंद्रायणी’ या मालिकेत तुम्ही पाहू शकता की , वटपौर्णिमेच्या शुभदिनी शकुंतला पूजेसाठी इंदूला घेऊन जाते. आनंदी या समारंभात इंदूच्या उपस्थितीवर आक्षेप घेते. परंतु झाडाजवळ साप दिसल्यावर इंदू धैर्याने अधूला जवळ घेत त्याचे सापापासून रक्षण करते. तेच ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेत आपल्याला दिसतंय की , एकीकडे सावी अर्जुनसाठी वटपौर्णिमेची पूजा करत असून बाच्याला सावीबद्दल भावना निर्माण होत आहेत. ‘सुख कळले’ या मालिकेत माधव मिथिलाला वचन देतो की, वटपौर्णिमेपर्यंत तो बँकेच्या फसवणुकीमागील खरा गुन्हेगार कोण आहे, हे शोधून काढणार आहे.

आता तुम्हीही वटपौर्णिमेचा हा ट्रॅक पाहू शकता. कलर्स मराठीने साजरी केलेली खास वटपौर्णिमा कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

मसाप निवडणूक'साहित्य संवर्धन आघाडी’ जाहीरनामा प्रसिद्ध पिंपरी, पुणे (दि. १३...

अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश

पुणे (दि. १३) : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत...

महापालिकेच्या विविध समित्यांवर सदस्यांची झाली निवड

पुणे - महापालिकेच्या मुख्य सभेत आज स्थायी समिती सदस्यांच्या...