Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एमएनजीएलचा पर्यावरण संवर्धनाचा संकल्प : चिखलीमध्ये पाच हजार वृक्षारोपण

Date:

पुणे--मानवी जीवनात झाडांचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे आपल्या सभोवताली वृक्ष वनराई असणं आवश्यक असते. त्याचेच महत्व ओळखून एमएनजीएलने आपले सामाजिक दायित्व राखून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला असून, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने 20 जून 2024 रोजी RTO Ground, चिखली, PCMC येथे 5000 हून अधिक झाडे लावली. हा हरित उपक्रम MNGL च्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत आरोग्य जनकल्याण संस्थेच्या सहयोगाने राबविण्यात आला.
यावेळी MNGL च्या स्वतंत्र संचालिका बागेश्री मंठाळकर, Managing Director- कुमार शंकरजी, Director Commercial-संजय शर्मा यांच्यासह वाहतूक शाखेचे Regional Transport Officer-PCMC- संदेश चव्हाण , निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक निरिक्षक सुरेश आव्हाड, राहुल जाधव, प्रकाश मुळे यांच्या सह एमएनजीएलचे सर्व प्रमुख अधिकार आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी एमएनजीएलच्या स्वतंत्र संचालिका बागेश्री मंठाळकर म्हणाल्या की, दिवसेंदिवस तापमान वाढत चालले आहे. पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक नागरिकाने झाडे लावली पाहिजेत व ती झाडे जगवली पाहिजेत. त्यामुळे च एमएनजीएलनेही आपले सामाजिक दायित्व राखण्यासाठी आज पाच हजार वृक्षारोपणाचा संकल्प पूर्ण केला आहे. भविष्यातही वृक्षसंवर्धनाच्या कार्यात एमएनजीएलचा सक्रीय सहभाग असेल, असा विश्वास व्यक्त केला.
संचालक कुमार शंकरजी म्हणाले की, एमएनजीएल सामाजिक दायित्व राखून नेहमीच कार्यरत असते. आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात नेहमीच कार्यरत आहे. आजच्या घडीला पर्यावरण संवर्धन देखील अतिशय महत्त्वाचे झाल्याने, पर्यावरण संवर्धनासाठी ही एमएनजीएलने पुढाकार घेतला आहे. आगामी काळात ही असे उपक्रम राबविण्यासाठी एमएनजीएल कटिबद्ध असेल, अशी ग्वाही दिली. त्यांच्या उत्साहाची प्रतिध्वनी श्री. संजय शर्मा यांनी व्यक्त केली, “हा उपक्रम केवळ PCMC ची जैवविविधता वाढवत नाही, तर निसर्गाशी असलेले आपले नातेही मजबूत करते.”
यावेळी वाहतूक शाखेचे निरीक्षक सुरेश आव्हाड, यांनी एमएनजीएलच्या पुढाकाराचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. यांनी RTO मध्ये विविध वृक्षारोपण inititives बद्दल सांगितले,त्यांनी वृक्षारोपणासोबतच त्यांची वाढ होताना काळजी घेणे हेही तितकेच महत्वाचे आहे हे पटवून सांगितले .. तसेच MNGL सोबत असेच हरित उपक्रम पुढेही करायला आवडतील असे सांगितले.
प्रकाश मुळे, यांनी आपण आपल्या पुढच्या generation sathi काय द्याच असेल तर तर ते आपण त्यांना -Clean water, clean air, clean food देउया, असा संदेश दिला. MNGL पुढच्या पिढ्यांसाठी हिरवेगार, आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या समर्पणाची पुष्टी करते, असेही त्यांनी नमूद केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...